महायुतीला मतदान म्हणजे विकासाला मतदान – विजय अग्रवाल

0

अकोला दिव्य ऑनलाईन : पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार विजय कमलकिशोर अग्रवाल यांनी विधानसभा निवडणुक प्रचारात येथील तारफैल भवानी पेठ मधील नागरिकांशी आज संवाद साधला.

काँग्रेस उमेदवाराला विजयी करण्यासाठी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना चांगल्या युवकाचा बळी देण्याचा प्रयत्न करत आहे. केवळ मतांचे विभाजन करण्यासाठी मुखवटा दाखवून हरीशभाई आणि मिश्रा यांचा वापर करून अकोला व राजराजेश्वर नगरीला पराभूत करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे यांना बळी न पडता आपण विकासाला म्हणजेच महायुतीला मतदान करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.

याप्रसंगी सुनील मेश्राम, माधुरीताई मेश्राम, किरण मेश्राम,गोपाल नागपुरे, शशी चोपडे,अरविंद शुक्ला, पवन महल्ले ,प्रशांत कदम सुमित मौर्य, रोहित गुप्ता, आशु ठाकूर, आकाश कवाडे, अमित मडपू, अनुप जाधव ,अविनाश शर्मा, सनी गवळी, रोशन मोर्य यांच्या सोबत पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here