Wednesday, October 23, 2024
Homeताज्या घडामोडीबुलढाण्यातील शिंदे सेनेचे आमदारद्वय गायकवाड आणि रायमुलकर यांना पुन्हा संधी :

बुलढाण्यातील शिंदे सेनेचे आमदारद्वय गायकवाड आणि रायमुलकर यांना पुन्हा संधी :

अकोला दिव्य ऑनलाईन : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील शिंदेसेनेची ४५ उमेदवारांची पहिली यादी मंगळवारी रात्री ११:३० वाजता जाहीर करण्यात आली. पश्चिम वऱ्हाडातील शिंदेसेनेचे बुलढाण्यातील दोन्ही विद्यमान आमदारांना शिंदेसेनेने पुन्हा संधी दिली आहे. बुलढाणा मतदारसंघातून संजय गायकवाड व मेहकरमधून डॉ.संजय रायमूलकर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.

महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटल्यानंतर भाजपने ९९ उमेदवारांची यादी दोन दिवसांपूर्वी जाहीर केली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रात्री ११:३० वाजता शिंदेसेनेच्या ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात बहुतांश विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. पश्चिम वऱ्हाडात बुलढाणा जिल्ह्यामध्ये शिंदेसेनेचे दोन आमदार आहेत. या दोघांनाही विधानसभा निवडणुकीसाठी शिंदेसेनेने पुन्हा रिंगणात उतरविले आहे. बुलढाणा मतदारसंघातून आमदार संजय गायकवाड हे दुसऱ्यांदा भाग्य आजमावणार आहेत. त्यासोबतच मेहकर या अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघातून आमदार डॉ. संजय रायमुलकर शिंदेसेनेचे उमेदवार असतील. शिंदेसेनेचे सचिव संजय मोरे यांच्या स्वाक्षरीसह उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली.

शिंदेसेनेचे उमेदवार

मतदारसंघ    उमेदवार

कोपरी पाचपाखाडी   एकनाथ संभाजी शिंदे    मुख्यमंत्री
साक्री (अज)    मंजूळाताई गावित    विद्ममान आमदार
चोपडा (अज)   चंद्रकांत सोनावणे    आमदाराचे पती
जळगाव ग्रामीण   गुलाबराव रघुनाथ पाटील    मंत्री
एरंडोल    अमोल चिमणराव पाटील    आमदार पूत्र
पाचोरा     किशोर धनसिंग पाटील  विद्ममान आमदार
मुक्ताईनगर     चंद्रकांत निंबा पाटील    विद्ममान आमदार
बुलढाणा     संजय गायकवाड    विद्ममान आमदार
मेहकर (अजा)     डॉ. संजय रायमुलकर    विद्ममान आमदार
दर्यापूर (अजा)     अभिजीत अडसूळ    माजी खासदार पूत्र
रामटेक     आशिष जैस्वाल    विद्ममान आमदार
भंडारा (अजा)    नरेंद्र भोजराज भोंडेकर    विद्ममान आमदार
दिग्रस     संजय दुलीचंद राठोड    मंत्री
नांदेड उत्तर    बालाजी कल्याणकर    विद्ममान आमदार
कळमनुरी   संतोष बांगर  विद्ममान आमदार.  जालना     अर्जुन पंडितराव खोतकर  माजी आमदार
सिल्लोड     अब्दुल सत्तार अब्दुल नबी    मंत्री.

संभाजीनगर मध्य     प्रदिप जैस्वाल     विद्ममान आमदार
छ. संभाजीनगर प. (अजा)    संजय शिरसाट सिडको अध्यक्ष
पैठण    विलास संदिपान भूमरे    खासदार पूत्र
वैजापूर    रमेश बोरनारे    विद्ममान आमदार
नांदगाव     सुहास कांदे    विद्ममान आमदार
मालेगाव बाह्य     ‌ दादाजी दगडूजी भुसे    मंत्री
ओवळा माजीवडा    प्रताप सरनाईक    विद्ममान आमदार
मागाठाणे    प्रकाश सुर्वे    विद्ममान आमदार
जोगेश्वरी (पूर्व)     मनिषा रविंद्र वायकर   खासदार पत्नी
चांदिवली     दिलीप लांडे    विद्ममान आमदार
कुर्ला (अजा)    मंगेश अनंत कुडाळकर  विद्ममान आमदार
माहीम     सदा शंकर सरवणकर    विद्ममान आमदार
भायखळा     यामिनी यशंवत जाधव  विद्ममान आमदार    
कर्जत     महेंद्र थोरवे    विद्ममान आमदार
अलिबाग    महेंद्र हरी दळवी    विद्ममान आमदार
महाड     भरत गोगावले    अध्यक्ष, एसटी महा.
उमरगा (अजा)    ज्ञानराज चौगुले    विद्ममान आमदार
परांडा     डॉ. तानाजी जयवंत सावंत    मंत्री
सांगोला     शहाजी बापू पाटील   विद्ममान आमदार
कोरेगाव     महेश संभाजीराजे शिंदे    विद्ममान आमदार
पाटण     शंभूराज शिवाजीराव देसाई    मंत्री
दापोली    योगेश रामदास कदम    अध्यक्ष, एमपीसीबी
रत्नागिरी    उदय रविंद्र सामंत    मंत्री
राजापूर    किरण रविंद्र सामंत    मंत्री बंधू
सावंतवाडी   दीपक वसंतराव केसरकर    मंत्री
राधानगरी     प्रकाश आबिटकर    विद्ममान आमदार
करवीर     चंद्रदीप शशिकांत नरके    माजी आमदार
खानापूर     सुहास अनिल बाबर    आमदार पूत्र

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!