आज सायंकाळी डेल्टा टीव्हीएस श्रीराम मंदिर झांकी व महाआरती :

0
आज सायंकाळी डेल्टा टीव्हीएस श्रीराम मंदिर झांकी व महाआरती :

अकोला दिव्य न्युज ब्युरो : अयोध्येतील बहुप्रतिक्षित श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या मंगलपर्वावर आज शुक्रवार १९ जानेवारीला डेल्टा टीव्हीएस परिसरात अयोध्येतील नवनिर्मित श्रीराम मंदिराची उभारलेल्या प्रतिकृतीत विराजमान केलेली भगवान रामचंद्र यांची मुर्ती भक्तांच्या दर्शनासाठी महाआरती करुन उघड करण्यात येत आहे.

विविध सामाजिक सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या श्री.आळशी प्लॉट मित्र मंडळ व हरीशभाई मित्र मंडळ अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात अकोलेकर भाविकांचा उत्साह आणि आनंद द्विगुणित होईल, यासाठी नेहरू पार्क येथे डेल्टा टीव्हीएस शोरुम हा कार्यक्रम आज शुक्रवार १९ जानेवारीला आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ६.३० वाजता हा सोहळ्याचा प्रारंभ कारसेवकांच्या हस्ते करण्यात येत आहे.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आ.रणधीर सावरकर,आ. वसंत खंडेलवाल, विजय अग्रवाल, हरीशभाई आलिमचंदाणी, किशोर मांगटे पाटील,जयंत म्हैसने, कृष्णा शर्मा, संतोष पांडे व अशोक शर्मा उपस्थित राहणार आहेत. या मंगलमय वातावरणात अकोलेकर भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून, महाआरतीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here