Homeहिंगोलीच्या मारवाडी गल्लीत अग्नी तांडव ! तिघांचा मृत्यू ; ८ जणांची प्रकृती...

हिंगोलीच्या मारवाडी गल्लीत अग्नी तांडव ! तिघांचा मृत्यू ; ८ जणांची प्रकृती चिंताजनक : १० जखमी

अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : हिंगोली शहरातील मारवाडी गल्लीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग (Fire) लागल्याची घटना काल सोमवारी ५ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली. फटाक्याचे गोदाम असल्याने दारुगोळ्याचा स्फोट होऊन आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केलं. या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची आणि ८ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत १६ जण जखमी झाले असून यात ८ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. या घटनेत अग्निशामक दलाची एक गाडीही जळून खाक झाल्याची सांगण्यात आले. आहे. आगीबाबत माहिती मिळताच, आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते.

शहरातील मारवाडी गल्ली म्हणजेच रहिवासी भागात इतक्या मोठ्या प्रमाणात फटाके ठेवल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली असून, आगीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या आगीमुळे मोठ्या प्रमाणात फटाके फुटत आहेत, त्यामुळे आग विझवण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. आग नेमकी कशामुळे लागली? या आगीत किती नुकसान झालं? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

दरम्यान, घटनास्थळी अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.या आगीच्या घटनेत जखमी झालेल्या १६ जणांपैकी ८ जणाची प्रकृती चिंताजनक आहे. हिंगोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जखमींवर उपचार सुरू आहेत. मृत्यू झालेल्यांचे मृतदेह देखील रुग्णालयात आणण्यात आले आहेत. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून प्रशासन खडबडून जागे झाल्याचं पाहायला मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील मारवाडी गल्लीत बासटवार यांचे घर आणि फटाक्यांचे गोदाम आहे. दिवाळीच्या तोंडावर त्यांनी गोदामात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांचा साठा करून ठेवला. दरम्यान, सोमवारी रात्रीच्या सुमारास अचानक या गोदामाला आग लागली. त्यानंतर काही क्षणांतच या आगीने रौद्ररूप धारण केले. आग लागल्यानंतर घरात साठवलेल्या फटाक्यांचे लागोपाठ जोरदार स्फोट होऊ लागले. या स्फोटांच्या आवाजाने आणि आगीच्या ज्वाळांमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड घबराट पसरली अन् नागरिकांची धावपळ उडाली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular