GEN-Z नेतृत्व ! प्रांजली देशमुख NSUI महाराष्ट्र प्रदेश महासचिव

    0
    2

    अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : विद्यार्थी चळवळीतील अभ्यासपूर्ण भूमिका, निर्भीड विचार आणि सातत्यपूर्ण संघर्षाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या प्रांजली देशमुख यांची नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) च्या महाराष्ट्र प्रदेश महासचिवपदी निवड झाली आहे.विद्यार्थी जीवनापासूनच संघर्ष करणाऱ्या प्रांजली हिने महाविद्यालयात नवीन सेमिस्टर पॅटर्नमुळे निर्माण झालेल्या शैक्षणिक समस्या व कोरोनाकाळातील परीक्षा पद्धतीतील तांत्रिक अडचणींचा विरोधात आवाज उठवला. सामूहिक मदत गोळा करून पूरग्रस्ताना मदतीचा हात दिला. दिल्ली येथे यूपीएससीची तयारी करताना अभ्यासक्रमातील बदलांमधून एकाच विचारधारेचा प्रभाव वाढत असल्याचे लक्षात आले. तेव्हा पुन्हा सामाजिक चळवळीत सक्रिय होऊन वैचारिक लढाई लढत आहेत.

    इंडियन स्पीकर्स फोरम व छत्रपती करंडक समितीच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या विविध सामाजिक, शैक्षणिक व वैचारिक चळवळीमध्ये सक्रिय सहभाग असतो. ‘जागर’ राज्यस्तरीय खुली वादविवाद स्पर्धा आणि संविधान जागर अभियानातून त्या जनजागृतीचे कार्य करतात. अकोल्यातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी सुरू झालेल्या साखळी अन्नत्याग आंदोलनाची सुरुवातही त्यांनी स्वतः अन्नत्याग करून केली.
    गेल्या तीन वर्षांत पक्षाच्या निवडणुकांमध्ये डेटा संकलन, संशोधन, नियोजनाची, बूथ बांधणी, मतमोजणी, SIR, कार्यकर्ता प्रशिक्षण, निवडणूक व्यवस्थापन प्रशिक्षण तयार करणे आणि कार्यकर्ते प्रशिक्षित करणे या सर्व गुणांचा संगम प्रांजली देशमुख यांच्या नेतृत्वात आहे.

    विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची जाण, संशोधन वृत्ती, अन्यायाविरुद्ध लढण्याचे धाडस आणि वक्तृत्व या बळावर प्रांजली देशमुख यांच्या अभ्यासू नेतृत्वातून महाराष्ट्रातील विद्यार्थी चळवळीला नवे बळ मिळेल. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना मांडण्याची राज्यस्तरावर संधी मिळेल. अशा नेतृत्वाची निवड राज्याच्या महासचिवपदी झाल्याने नवीन तरुण पिढी जेन झी तसेच जेन अल्फा एन. एस. यू. आय सोबत जुळतील आणि संघटन अधिक मजबूत आणि प्रभावी पद्धतीने कार्य करेल अशी चर्चा सर्वत्र होत आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    error: Content is protected !!