अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशचे उपाध्यक्ष व माजी महापौर मदन भरगड यांनी आज रविवार दि.१८ ऑक्टोंबर रोजी सर्वोपचार रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान करून वाढदिवस साजरा केला.

यावेळी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना दीर्घायुष्य लाभो अशी मनोकामना व्यक्त केली. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना पोटभर नाश्ता मिळाल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले.यावेळी प्रदेश उपाध्यक्ष मदन भरगड, शत्रूधन बिरकड,राजेंद्र चितलांगे, रफिक लाखनी,अभिषेक भरगड, पप्पू खान, सुनील पसारी, धनराज सत्याल, शेख बबलू,जहांगीर खान,गणेश बामनेट शेरअली पहलवान, सूरज भरगड, रोहित भाटिया, ठक्कर, गोपाल सरोदे,मनोहर सरकते,अमोल पाटिल आदी उपस्थित होते.
