Homeहिंगोली पॅटर्न ठरतोय आदर्श ! महाराजा अग्रसेन यांना हीच खरी आदरांजली

हिंगोली पॅटर्न ठरतोय आदर्श ! महाराजा अग्रसेन यांना हीच खरी आदरांजली

अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : गजानन सोमाणी एडिटर इन चीफ : अग्रवाल समाजाचे आराध्य दैवत छत्रपती महाराज अग्रसेन यांचा जयंती सोहळा धुमधडाक्यात साजरा करण्याची लगबग आणि नवरात्र व दसरा आणि दिवाळी अशा सण उत्सवाच्या तोंडावर हिंगोली शहरातील दाट वस्तीच्या मारवाडी गल्लीत ५ ऑक्टोबर रोजी रात्री फटाक्यांच्या गोदामात लागलेल्या भीषण आगीत तीघांचा दुर्दैवी मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे.या घटनेत जखमी झालेल्या १५ जणांत ८ जणांची प्रकृती चिंताजनक असून महाराजा अग्रसेन सेवा समितीचे सक्रिय सदस्य कृष्णा बजरंगलाल अग्रवाल अतिगंभीर जखमी झाल्याने त्यांना पुढील तातडीच्या उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे. !

संपूर्ण अग्रवाल समाजात शोककळा पसरली असताना हिंगोलीतील अग्रवाल समाजाने संवेदनशीलता आणि सामाजिक एकजुटीचे एक अभूतपूर्व उदाहरण समोर ठेवले आहे. आपल्या सहकाऱ्याच्या जीवनावरील संकट पाहता, समाजाने रविवार, ११ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेला महाराजा श्री अग्रसेन जयंती उत्सव पूर्णपणे रद्द करण्याचा अत्यंत कौतुकास्पद आणि भावनिक निर्णय घेतला आहे.

महाराजा अग्रसेन जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही समाजाने धुमधडाक्यात उत्सव साजरा करण्यासाठी देणगी स्वरूपात मोठी रक्कम जमा केली होती. मात्र, आपल्याच समाजातील एक तरुण मृत्यूशी झुंज देत असताना कोणताही उत्सव साजरा न करण्याचा निर्णय समाजाने घेतला. जयंती उत्सवाचा संपूर्ण खर्च बाजूला ठेवून, जमा झालेली सर्वच रक्कम कृष्णा अग्रवाल यांच्या उपचारासाठी त्यांच्या कुटुंबाला समर्पित केली जाणार आहे. ‘मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे” या तत्त्वाला जागून समाजाने घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

संकटकाळात समाजाने काय करावे? हिंगोली पॅटर्न ठरतोय आदर्श

वर्षभरातून एकदा येणारे महापुरुषांचे जन्मोत्सव समाजाला एकत्र आणण्यासाठी महत्त्वाचे असतात. मात्र, हिंगोलीच्या अग्रवाल समाजाने दाखवून दिले आहे की, उत्सवांपेक्षा संकटकाळात एकमेकांच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी समाजशक्ती आहे. या संवेदनशील घटनेच्या पार्श्वभूमीवर, अशा प्रसंगी कोणत्याही समाजाने आणि नागरिकांनी मानवीय दृष्टिकोनातून नेमके काय केले पाहिजे, याचे उत्तम धडे मिळतात.

  • उत्सवांचे उदात्तीकरण टाळणे: जेव्हा समाजातील एखादा घटक किंवा कुटुंब मोठ्या संकटात असते, तेव्हा मोठे उत्सव किंवा मनोरंजनाचे कार्यक्रम तात्काळ थांबवून आपली सहसंवेदना प्रकट करणे.
  • आर्थिक पाठबळ देणे: उत्सवासाठी किंवा सजावटीसाठी होणारा अनावश्यक खर्च टाळून, तो निधी थेट गरजूच्या वैद्यकीय उपचार किंवा मदतीसाठी वळवणे.
  • अफवांना आळा घालणे: अशा दुर्घटनेच्या वेळी सोशल मीडियावर कोणत्याही चुकीच्या अफवा पसरू न देता शांतता राखणे.
  • मानसिक धीर देणे: केवळ आर्थिकच नव्हे, तर संकटग्रस्त कुटुंबाच्या पाठीशी प्रत्यक्ष उभे राहून त्यांना आपण सर्व एकत्र आहोत, अशी ग्वाही देणे.
  • ‘कृष्णा’ यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना, हीच महाराजांना आदरांजली
  • हिंगोली येथील अग्रवाल समाजाने घेतलेला हा निर्णय केवळ एका समाजापुरता मर्यादित नसून, संपूर्ण मानवतेसाठी आणि सामाजिक एकतेसाठी एक मोठी मिसाल ठरला आहे. सध्या संभाजीनगर येथे उपचार घेत असलेले कृष्णा बजरंगलाल अग्रवाल हे या संकटातून लवकरात लवकर बाहेर यावेत आणि पूर्णपणे बरे होऊन आपल्यात परतावेत, यासाठी संपूर्ण हिंगोलीकरांकडून व अग्रवाल समाजाकडून प्रार्थना केली जात आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular