अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : आंतरशालेय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेत अकोला शहरातील ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. अकोला येथील स्कूल ऑफ स्कॉलर्सतर्फे आयोजित ‘अनामवीरा’ या देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेत बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी ‘ब’ गटातून सहभाग घेत द्वितीय क्रमांक पटकावला. या समूहात मधुरा राजेश भोंडे, आर्या अभिजित शेगावकर, पलक मिलिंद लांडे, ओजस्वी पराग देशमुख, स्वरा प्रफुल्ल वरोकार, शांभवी अभिषेक सोनगावकर, आनंदी अनिल कुलकर्णी आणि भार्गव अनिल भगत यांचा समावेश होता.

तसेच ‘अ’ गटातील वैयक्तिक गायन स्पर्धेत के.जी.-२ च्या स्वराज समीर थोडगे याने प्रथम क्रमांक मिळवत बाल शिवाजी शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. स्वराज हा अकोला अर्बन बँकेचे मुख्य कार्यालयाचे अधिकारी समीर थोंडगे यांचा मुलगा आहे.
या विद्यार्थ्यांना गायनासाठी सौ. सरोज जोशी यांनी हार्मोनियमची साथ दिली, तर पुरुषोत्तम कोरान्ने यांनी तबल्याची साथ दिली. तसेच समर्थ विजय ढोरे या विद्यार्थ्याने ही तबल्याची साथ देत स्पर्धेत योगदान दिले.