अकोला दिव्य न्यूज : गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : चालुक्य काळातील प्राचीन शिवमंदिर अकोला शहराचे मुख्य श्रद्धास्थान आहे. आज या शिव मंदिरामुळे अकोला शहराला ‘राजराजेश्वर नगरी’ म्हणूनही ओळखले जाते.मोर्णा नदीच्या काठी वसलेले अकोला शहर समृद्ध धार्मिक आणि ऐतिहासिक वारशाने नटलेले असून भगवान शिवाचे प्राचीन श्री राजराजेश्वर मंदिरामुळे अकोला शहरच नव्हे तर संपूर्ण भूभाग पावन झाला आहे. अशा या पावन भूमीतील शिव-शंकराशी जुळल्या गेलेली सर्व शिव मंदिरे मुळात भक्तांच्या श्रध्दास्थानीच आहेत.

मनात भाव असला की देव पावतो ! असं म्हटलं जातं ते उगीच नाही ! अनेकांनी हा अनुभव घेतला असून अकोल्यातील अनेक शिवभक्त काही कारणाने देशातील सर्वच ‘बारा ज्योतिर्लिंग’ चे दर्शन करू शकत नाही.तसेच ‘मनात भाव असला की महात्म्य अनेकांना माहीत नसावे. या विचाराने शहरातील वेगवेगळ्या भागात असलेल्या शिव मंदिराची माहिती घेऊन सुनील नावंदर या हरहुन्नरी कलावंताने ‘मनात भाव असला की’ हा भगवान शिव, विशेषतः रुद्राचे स्तूप करणारे एक अतिशय प्रसिद्ध आणि प्रभावी संस्कृत स्तोत्रच्या माध्यायमातून शिवभक्तांना अकोला शहरातील शिव मंदिरांतील शिवलिंगाचा दर्शनाचा घरबसल्या लाभ देण्यास, रुद्राष्टकम’च्या माध्यमातून शिवआराधनेची एक माळ दिली आहे. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
‘नमामी शमीशान निर्वाणरूपं…’ या ओळीने सुरू होणारे हे स्तोत्र भक्तांना मानसिक शांतता आणि शिवकृपा मिळवून देते.रुद्राष्टकमची हे स्तोत्र संत तुलसीदास यांनी रचले आहे : रुद्राष्टकममध्ये शिवाला आकाशसारखे निराकार, विकरारहित आणि मोक्षस्वरूप मानले आहे.भगवान शिव दयाळू, नीलकंठ, त्रिशूलधारी आणि कोटी सूर्यासारखे प्रकाशमान आहेत.

दररोज पाठाने मनातील भीती आणि वाईट शक्तींचा प्रभाव नष्ट होतो.मन शांत होते आणि ध्यानात एकाग्रता वाढते.आरोग्य व सुख: महाशिवरात्रीला किंवा दररोज पठण केल्याने आरोग्य सुधारते व शिवकृपा प्राप्त होते. सुनील नावंदर यांनी अकोला शहरातील जवळपास ४१ शिव मंदिरातील शिवलिंग मध्ये बारा ज्योतिर्लिंगाच अस्तित्व असल्याचा भाव ठेवून निर्मिती केलेलं रुद्राष्टकमचे लिरिक्स तुम्हाला नक्कीच आवडेल !