अकोल्याचे पद्मालय वेलनेस सेंटर म्हणजे आरोग्य, संस्कार, निसर्ग व भारतीय ज्ञानपरंपरेचा अनुभव

0

अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : बदलत्या जीवनशैलीत आजारावर उपचार करण्यापेक्षा ते होऊच नयेत यासाठी खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या दृष्टीने ‘वेलनेस सेंटर’ ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज बनली असून, शरीराला निरोगी ठेवण्यासाठी ही एक उत्तम प्रतिबंधात्मक उपाययोजना आहे,’ असे प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी पद्मालय वेलनेस सेंटर व अॅग्रोन कृषी पर्यटन केंद्रांच्या लोकार्पण सोहळ्यात केले. प्रत्येकाने आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहून याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

अत्यंत उत्साहात पार पडलेल्या या सोहळ्याला अकोला जिल्हा पालकमंत्री आकाश फुंडकर, ह.भ.प.संजय महाराज पाचपोर, माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, संतोषकुमार डिडवाणी, माजी महापौर विजय अग्रवाल, शेगावचे शरद अग्रवाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजय देशमुख तसेच प्रकल्पाचे फाउंडर डॉ.मनोज अग्रवाल आणि सी.ई.ओ. डॉ. वर्षा अग्रवाल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

अकोल्यापासून सात किलोमीटर अंतरावर गायगावनजीक ‘पद्मालय वेलनेस आयुर्वेद व निसर्गों पचार’ आणि ‘अॅग्रोन कृषी पर्यटन केंद्र’ या दोन महत्त्वपूर्ण व समाजोपयोगी उपक्रमांची निर्मिती करण्यात आली. केंद्रीय आयुष राज्यमंत्री ना. जाधव यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात या दोन्ही उपक्रमांचे लोकार्पण करण्यात आले.

उद्घाटनानंतर मंत्री प्रतापराव जाधव यांनी संपूर्ण प्रकल्पाची अगदी बारीकसरीक बाबींसह अत्यंत उत्साहाने पाहणी केली. विदर्भातील या पहिल्याच अत्यंत भव्य आणि आधुनिक प्रकल्पात शरीर, मन आणि आत्म्याच्या आरोग्याचा विचार करणारे वेलनेस सेंटर आणि भारतीय कृषी संस्कृती, पर्यावरण संवर्धन आणि शैक्षणिक मूल्यांची ओळख करून देणारे कृषी पर्यटन केंद्र या दोन्ही उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना एकाच ठिकाणी आरोग्य, शिक्षण, संस्कार, निसर्ग आणि भारतीय ज्ञानपरंपरेचा अनुभव मिळणार आहे. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच या प्रकल्पाची उभारणी केल्याबद्दल त्यांनी प्रकल्पाचे फाउंडर डॉ. मनोज अग्रवाल आणि सी.ई.ओ. डॉ. वर्षा अग्रवाल यांचे भरभरून कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सोहळ्याला नवलकुमार भरतीया, दिपक भरतीया,अश्विन भरतीया, डॉ. राजीव बियाणी, गजानन सोमाणी, किशोर कापडे, रत्नमाला कापडे, लायन्सचे पीडीजी अश्विनी बाजोरिया, रमाकांत खेतान, लॉयन्स क्लब अकोला मिडटाउनचे अध्यक्ष अमित अग्रवाल, सचिव प्रशांत फुलारी, कॅबिनेट ऑफिसर सुभाष चांडक, प्रमोद चांडक, घनश्याम जोशी, अनुराग अग्रवाल, अविनाश राऊत, बबलू अग्रवाल, बंटी कागलीवाल, तरण खत्री, अशोक गुप्ता, जगदीश झुनझुनवाला, गिरधर कापडे, नवकिशोर मोदी, कन्हैयालाल अग्रवाल, विनय मंत्री, सुमित अग्रवाल, डॉ.एस.एम.अग्रवाल, डॉ.अनिल तोष्णीवाल, कमल किशोर बाहेती, वसंतलाल सारडा, डॉ. प्रवीण चव्हाण, रवी चांडक, अजय सेंगर, आनंद चौरसीया, देवेंद्र अग्रवाल, दिपक खंडेलवाल, उषा विरक, अशोक धानुका, अँड सुभाष ठाकूर, अॅड. मनोज सोनालावाला, अशोक सोनालावाला, प्रेमचंद अग्रवाल, अशोक झुनझुनवाला, डॉ. राजेश सराफ, विजय पाडीया, जगदीश नारोलिया, राजू जैन, दिनेश शहा, सुनील अग्रवाल, अनिल अग्रवाल, रवींद्र अग्रवाल, विजय भरतीया, दिपक चौधरी, सुरेश खंडेलवाल, विष्णू खंडेलवाल, डॉ. संकेत अग्रवाल, कमल शर्मा, दर्शित खंडेलवाल, विजय चौधरी, प्रकाश धानुका, जसपालसिंग नागरा, गौतम भय्या, आशिष अग्रवाल, आणि गणेश अग्रवाल यांच्यासह सामाजिक, वैद्यकीय, विधिज्ञ आणि व्यावसायिक क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

या सोहळ्याचे सूत्रसंचालन अॅड. गोपाल आखरे यांनी आपल्या अभ्यासू शैलीत केले, तर उपस्थितांचे आभार डॉ. मनोज अग्रवाल यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here