अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : माहेश्वरी समाजातील चिरपरिचित व्यक्तीमत्व, माहेश्वरी महिला मंडळाच्या संस्थापक सदस्य,अध्यक्ष आणि सर्वसमाजातील महिलांच्या विकासासाठी कटिबद्ध राष्ट्रीय महिला मंडळात विविध पदांवर काम करून शेवटपर्यंत महिलांच्या सक्षमीकरणावर ठाम राहिलेल्या मधुमालती शशिमोहन तापडिया यांचे आज बुधवार रोजी सकाळी ह्र्दय विकाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ९२ वर्षाचे होते.

स्वातंत्र्य सेनानी सुगनचंद तापडिया यांच्या सुन आणि अनिल तापडिया व अजय तापडिया यांच्या आई होत्या. त्यांच्या मागे दोन मुले, सुन ज्योत्स्ना तापडिया, कृष्णा तापडिया, नातू सचिन, प्रसन्न व पुष्कर दोन नातसूना आणि पणतू असे मोठे आप्त परिवार आहे.
अलिकडच्या काळात वयोमानानुसार शरीर प्रकृतीच्या कुरबुरी सुरू होत्या. मात्र घरी आलेल्या पाहुण्यांसह प्रत्येकासोबत ठणठणीत बोलणं, हास्यविनोद करीत घरभर व्हीलचेअरने चालणं, खानपान देखील चांगलेच सूरु होते. आठवड्यापूर्वी त्यांचा सोबत जवळपास १ तासांपेक्षा जास्त वेळ बातचीत करताना असं वाटतं नव्हतं की ‘बाई’ सोडून जाणार आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापित राष्ट्रीय महिला मंडळांतील सावित्रीबाई ब्रजलालजी बियाणी, बसंतीबाई झंवर, शांताबाई राठी यांच्यासह सगळ्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी बिर्ला क्रीडा भवनातील बालक मंदिरातील शैक्षणिक कामासाठी परिश्रम घेतले.

त्याच्या जेष्ठ सून ज्योत्स्ना तापडिया यांनी देखील माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षासह विविध पदांवर कार्य केले आहे. मुंगलाल बाजोरिया विद्यालय संचालित संस्थेचे अनिल तापडिया सचिव असून अजय तापडिया हे अकोला नगर परिषदेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अकोला महानगर अध्यक्ष होते.
त्याच्या पार्थिव देहाची अंतिम यात्रा आज बुधवार १५ जुलै २०२६ रोजी दुपारी ४.३० वाजता त्यांचे राहते घर , मधुकृष्ण, रघुनायक अपार्टमेंट के पास, माधव नगर, तुकाराम चौक अकोला येथून मोहता मिल रोड येथील मोक्षधामसाठी निघणार आहे.
