पुण्यातील विदर्भवासीयांसाठी हक्काचे विदर्भ चॅरिटेबल फांऊडेशन ! कार्यालय सेवेत रुजू

0

अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : पुणे तेथे काय उणे या उक्तीप्रमाणे विद्याचे माहेरघर असलेल्या पुणे आणि परिसरात वास्तव्यास असलेल्या विदर्भवासीयांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. अकोला येथील मुळ निवासी दिलीप सिंग गोसल यांनी मागील एक वर्षापासून पुढाकार घेऊन, सतत प्रयत्नशील राहिले आणि अखेर ‘विदर्भ चॅरिटेबल फाउंडेशन’ या नावाची संस्था रितसर स्थापना केली. या संस्थेच्या कार्यालयाचे नुकतेच थाटात विधिवत उद्घाटन करण्यात आले.

पुण्याचा मध्यभागी असलेल्या जे.एम रोड जवळ, रेवन्यू कॉलोनीत विदर्भ चॅरिटेबल फाऊंडेशनचे कार्यालय सुरू केले आहे.‌पुण्यात राहत असलेल्या विदर्भातील लोकांचा हे एक प्रमुख केंद्र होणार आहे. ज्यांच्या कल्पनेमुळे फाऊंडेशन स्थापित झाले आहे असे विदर्भाचे संस्कृतीक नेते व फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. गिरीश गांधी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

विदर्भ फाउंडेशनचे अध्यक्ष दिलीपसिंग गोसल यांनी या प्रसंगी स्वागतपर भाषणात या मागची भुमिका सांगितली. फाउंडेशनचे उपाध्यक्ष डॉ. शहाजी देशमुख यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात फाउंडेशनकडून भविष्यात राबविण्यात येणार असलेल्या योजना आणि कामाची माहिती दिली. उद्घाटक डॉ. गिरीश गांधी यांनी फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून यथोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन अर्चना अनुराधा यांनी केले. या प्रसंगी फाउंडेशनला उल्लेखनीय सहकार्य केल्याबद्दल आर्किटेक्ट रामेश्वर मणियार यांचा सत्कार करण्यात आला.

उद्घाटनप्रसंगी विदर्भ फाउंडेशनचे पदाधिकारी प्रसन्ना कुलकर्णी, अनिता टेंबे गोसल,डॉ.छाया देशमुख,आकाश आंबाडे,रजनी आंबाडे, महेश दुधाळकर, अभिजीत फाळके, प्रवीण राजगुरू, ममता तायडे, उद्योजक, रमेश भंडारी, रेडक्रॉस सोसाइटी अकोल्याचे सचिव प्रभजीतसिंग बछेर, सचिन झंवर, संजना झंवर आणि मोठ्या संख्येने विदर्भातील लोक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here