Tuesday, May 19, 2026
No menu items!
No menu items!
Homeयश डोक्यात न ठेवता पुढचा यशाचा मार्ग चालायला लागा — सिनेअभिनेते भारत...

यश डोक्यात न ठेवता पुढचा यशाचा मार्ग चालायला लागा — सिनेअभिनेते भारत गणेशपुरे

लोकरंगच्या ३ दिवसीय नाट्य प्रशिक्षण शिबिराचा समारोप
अकोला दिव्य न्यूज : कितीही माेठ यश मिळालं तरी ते डाेक्यात न ठेवता, त्याचाच आनंद साजरा करत न बसता, पुढच्या अजून नवीन काही याेजना करण्यासाठी कामाला लागलं पाहिजे.असं प्रतिपादन सुप्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरे यांनी केले. ‘लाेकरंग’ आयाेजित तीन दिवसीय नाट्य प्रशिक्षण शिबिराच्या समाराेपीय समारंभात ते बाेलत हाेते. यावेळी मंचावर ‘लाेकरंग’चे अध्यक्ष अनिल गावंडे, प्रभात किड्स स्कूलचे संचालक डॉ. गजानन नारे, ज्येष्ठ रंगकर्मी अशाेक ढेरे, प्रभात किड्सच्या संचालिका वंदना नारे, प्राचार्य प्रदीपसिंह राजपूत, प्रा. डाॅ. ममता इंगाेले, नीरज आवंडेकर, डाॅ. संदीप चव्हाण, श्रीकांत पागृत उपस्थित हाेते.

प्रास्ताविकातून ‘लाेकरंग’ संस्थेची सांस्कृतिक आणि कलाविषयक भूमिका स्पष्ट करीत ‘लाेकरंग’र्ते राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती देत भविष्यातील सांस्कृतिक याेजनांचाही आढावा घेण्यात आला. प्रभात किड्स स्कूलचे संचालक डॉ.गजानन नारे यांनी मनाेगतातून अशा प्रकारच्या कलाविषयक व व्यक्तिमत्त्व विकास घडविणा-या उपक्रमांसाठी प्रभात किड्स स्कूल सदैव तत्पर राहील, अशी ग्वाही दिली.अभिनय, नाट्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

शिबिरातील प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनीही आपले अनुभव व्यक्त करताना या शिबिरातून आत्मविश्वास,अभिनय काैशल्य व संवाद काैशल्य विकसित झाल्याचे आद्या देशमुख, तीर्था धबाले, कैवल्य जयस्वाल, त्रिशा इंगाेले, आरुषी करे, सई तायडे, हिमांशु बन्सल, प्रियांशी शेगाेकार, आराध्या दुताेंडे, रेवती ढाेरे, गाेपाल गाडगे व गाैतमी मापारी यांनी सांगितले. पालकांमधून प्रा.विश्वास मापारी यांनी मनाेगत व्यक्त केले. यावेळी सुप्रसिद्ध सिने अभिनेते अंकुर वाढवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, कलाक्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर ऊर्जा, सातत्य आणि सकारात्मकता कायम ठेवावी लागते,असे सांगितले. ‘लाेकरंग’चे अध्यक्ष अनिल गावंडे यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना अशा सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सातत्याने सहभागी हाेण्याचे आवाहन केले.विद्यार्थ्यांच्या कलागुणांना याेग्य दिशा मिळावी यासाठी ‘लाेकरंग’ भविष्यातही विविध सांस्कृतिक उपक्रम राबवत राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रभातच्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख नंदकिशाेर डंबाळे यांनी केले. तसेच उपस्थित मान्यवर, पालक व प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचे आभार त्यांनी मानले. समाराेप समारंभाला माेठ्या संख्येने पालक व नागरिक उपस्थित हाेते. कार्यक्रमानंतर पालकवर्गामध्ये अशा प्रकारच्या सांस्कृतिक आणि व्यक्तिमत्त्व विकास घडविणाऱ्या उपक्रमांचे काैतुक करण्यात येत हाेते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!