दहावीच्या परीक्षेत जयश्री योगेश अग्रवाल अकोल्यातून अव्वल !

0

अकोला दिव्य न्यूज : इयत्ता १० वीच्या परिक्षेचा आज जाहीर करण्यात आलेल्या निकालात 98.20 टक्के गुण प्राप्त करून जयश्री योगेश अग्रवाल हिने अकोल्यात अव्वल स्थान पटकावले आहे. येथील माऊंट कारमेल शाळेची विद्यार्थी असलेल्या जयश्री अग्रवाल हिने विज्ञान, गणित आणि संस्कृत या विषयांत शंभर पैकी शंभर गुण मिळवत गुणवत्ता व नियमित अभ्यासाची छाप उमटवली आहे. या उल्लेखनीय यशाने अग्रवाल कुटुंब व शाळेत उत्साहाचे वातावरण पसरले आहे. कॉंग्रेस इंटकचे नेते रूपचंद अग्रवाल यांची ती नात आणि शिवसेना उपजिल्हाप्रमुख योगेश अग्रवाल यांची मुलगी आहे.
नियमित अभ्यास, योग्य नियोजन व शिक्षकांच्या मार्गदर्शन यामुळे हे यश मिळाल्याचे तीने सांगितले. तिच्या यशामागे आजोबा रूपचंद अग्रवाल, मोठे बाबा व आई-वडिलांचे प्रोत्साहन आणि कुटुंबातील शैक्षणिक वातावरणामुळे महत्त्वाचे ठरले आहे.

अकोला दिव्य छायाचित्र

जयश्री हिचा मोठा भाऊ तेजस अग्रवाल सध्या एमबीबीएसचे शिक्षण घेत असून त्यांच्याकडूनही सतत प्रेरणा मिळत असल्याचे तिने नमूद केले. शाळेच्या मुख्याध्यापकांनी जयश्रीचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच इतर विद्यार्थ्यांनी तिच्या यशातून प्रेरणा घ्यावी, असे मत व्यक्त केले. जयश्रीला भविष्यात वैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊन समाजसेवा करण्याची इच्छा आहे. तिच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here