Sunday, March 1, 2026
No menu items!
No menu items!
Homeआ.मिटकरींच्या 'एकला चलो'ने पक्षाच्या एकजुटीला तडा ! माजी महापौर भरगड यांचं रोखठोक

आ.मिटकरींच्या ‘एकला चलो’ने पक्षाच्या एकजुटीला तडा ! माजी महापौर भरगड यांचं रोखठोक

अकोला दिव्य न्यूज : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताची सखोल व निष्पक्षपणे चौकशीची मागणी केवळ वैयक्तिकरीत्या न करता आ.मिटकरी यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून ही मागणी केली असती तर ती अधिक सक्षम झाली असती. मिटकरी यांच्या एकला चलो रे, भुमिकेमुळे पक्षातील इतर तमाम नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडे लोक एक वेगळ्या दृष्टीने बघत आहेत.आ.मिटकरींनी परिस्थितीचें भान ठेवले पाहिजे होते. त्यांच्या या भूमिकेमुळे पक्षाला या दुर्दैवी घटनेचे सोयरेसुतक नाही.अशी पक्षाची प्रतिमा झाली आहे, अशा शब्दात माजी महापौर मदन भरगड यांनी लोकभावनेला वाट मोकळी करून दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी मृत्यूने महाराष्ट्र स्तब्ध झाला आहे. राष्ट्रवादी पक्षाचे सगळेच नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मोठा हादरा बसला आहे. या अपघाताची सखोल चौकशी व्हावी, ही तमाम महाराष्ट्राची देखील मागणी आहे. अपघात घडल्याचा काही वेळातच आ.अमोल मिटकरी यांनी काही मुद्दे उपस्थित केले होते. त्यामध्ये काहीही गैर नाही. अनेकांच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले होते. पण त्यानंतर याबाबत आ.मिटकरी सातत्याने एकटेच पुढाकार घेत असल्याने पक्षातील इतर नेते गप्प का? असा प्रश्न लोकांच्या मनात उपस्थित होणे स्वाभाविक आहे.असं देखील माजी महापौर भरगड यांनी मत व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केवळ राजकीय पक्ष नाही तर एक कुटुंब आहे. ही बाब मिटकरी विसरले आहेत. दिवंगत नेते अजितदादा यांच्या अपघाती निधनाची चौकशीची मागणी पक्षाच्या माध्यमातून केली असती. तर सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या एकजुटीचा संदेश दिसून आला असता. असं भरगड यांनी सांगितले.आ.मिटकरींच्या ‘एकटा’वृत्तीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि नेत्यांविषयी काही जण जाणीवपूर्वक दिशाभूल व बदनामीकारक माहिती सोशल मीडियावर पसरवत आहेत. याकडे भरगड यांनी लक्ष वेधले.

समाजमाध्यमांवरच्या ट्रोलिंगला घाबरून जाऊ नये.तर वस्तुस्थिती आणि तथ्यांच्या आधारावर नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रोखठोक भूमिका घेत ठामपणे उत्तर द्यावे.असे आवाहन भरगड यांनी केले. विमान अपघातांच्या सखोल चौकशी व्हावी, यासाठीची म हा मिटकरींचा एकट्याचा लढा नाही. ही बाब प्रकर्षाने जाणवते

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!