Tuesday, February 24, 2026
No menu items!
No menu items!
Homeजेष्ठ पत्रकार गजानन सोमाणी यांचा 'पत्रकार भुषण सेवा गौरव' पुरस्काराने लोकस्वातंत्र्य पत्रकार...

जेष्ठ पत्रकार गजानन सोमाणी यांचा ‘पत्रकार भुषण सेवा गौरव’ पुरस्काराने लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघातर्फे सन्मान

समत्वभाव जपला तर जगातलं कोणतंही यश अशक्य नाही -अॕड रामेश्वर ठाकरे

अकोला दिव्य न्यूज : जात,धर्म,पंथ,भाषा,अशा विविध भेदभावांना तिलांजली देऊन सामाजिक क्षेत्रात समत्वभाव जपून केले जाणारे मानवसेवी कार्य करणाऱ्यांना जगातलं कोणतंही यश मिळवणं अशक्य नाही. अशा पध्दतीने वाटचाल करणाऱ्यांना कोणतीही शक्ती हरवू शकत नाही. असे प्रतिपादन अकोल्यातील प्राचीन राजराजेश्वर मंदिराचे अध्यक्ष अॕड.रामेश्वर ठाकरे यांनी केले.

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ५४ व्या मासिक विचारमंथन मेळाव्यात लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून पत्रकार व सामाजिक कल्याणाच्या भेदभावविरहीत वाटचाल, या वास्तवाची तुलना करतांना प्रमुख पाहुणे म्हणून अँड ठाकरे बोलत होते.

जठारपेठेतील जैन रेस्ट्रो येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवेदिका जया भारती होत्या. लोकस्वातंत्र्यचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख, प्रा.डॉ.संतोषभाऊ हुशे, पत्रकार निशाली पंचगाम, अॕड.प्रजानंद उपर्वट यांची विचारमंचावर प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी संत गाडगे बाबा तथा महापुरूषांना वंदन अभिवादन करून मेळाव्याला सुरुवात करण्यात आली.‌ प्रमुख पाहुणे अँड ठाकरे पुढे म्हणाले की, अलिकडच्या काळात पत्रकारिता क्षेत्रात नैतिक जबाबदारीचे भान हरपून जाऊन, व्यावसायिक वृत्ती जोपासली जाते आहे. जुन्या पिढीतील पत्रकारांनी नितीमत्तासोबत सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून केले काम दिशादर्शक ठरले आहे.

प्रास्ताविकातून लोकस्वातंत्र्यचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांनी संघटनेची वाटचाल आणि आजगत केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडताना, अकोला शहरातील वृत्तपत्र क्षेत्रात मागील ३९ वर्षांपासून सक्रिय संपादक व जेष्ठ पत्रकार गजानन सोमाणी यांच्या अनुभवाचा फायदा नवीन पिढीने घेऊन आपली पत्रकारिता समृद्ध करावी. या क्षेत्रात त्यांनी केलेल्या प्रदीर्घ सेवेची आणि त्यांच्या कार्याची दखल घेऊन राज्य स्तरावरील ‘लोकस्वातंत्र्य पत्रकार भुषण सेवा गौरव’ पुरस्काराने सन्मानित करताना संस्थेला अभिमान वाटतो आहे.असे प्रतिपादन केले.

सत्काराला उत्तर देताना जेष्ठ पत्रकार गजानन सोमाणी म्हणाले की तत्कालीन मध्य प्रांतात साप्ताहिक व-हाड समाचार नावाचे सर्वात पहिले वृत्तपत्र अकोल्यात सुरू करुन बॅरिस्टर खंडेराव बालाजी फडके यांनी अकोला शहरात पत्रकारीतेची मुहूर्तमेढ रोवली. इंग्रजांच्या राजवटीवर फडके यांनी आपल्या लेखनातून हल्ले तर केलेच, यासोबतच विकासाच्या दृष्टीने सातत्याने व नेमके लिखाण केल्याने १८७४ मध्ये लोखंडी पुल बांधण्यात आला.कापसावर आधारित उद्योग आणि व्यापारासाठी लेखणी झिजवल्याने १८७९ मध्ये पहिले जिनिंग सुरू झाले. हे केवळ सामाजिक दायित्वाच्या जाणिवेतून पत्रकारिता केल्यानेच ! पत्रकारिता क्षेत्रात आलेल्या नवीन पिढीने भरपूर वाचन करून आपल्या ज्ञानात भर घालणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन करून सोमाणी यांनी पत्रकारिता आणि अकोला शहराचा इतिहास विषद केला. संघटनेची वाटचाल व अधिक यशासाठी संजय देशमुख यांनी निरंतर सक्रिय राहून काम करावे अशी अपेक्षा सोमाणी यांनी व्यक्त केली.

अध्यक्षिय मनोगतातून व्यक्त करताना जया भारती यांनी पत्रकारिता हा एक छंद आहे. तो जोपासतांना बातम्यातील सत्त्यता सांभाळून विश्वासपात्र पत्रकारिता व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी पंजाबराव वर लिखित ‘गाथा रमाईची’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.अॕड.प्रजानंद उपर्वट यांनी समिक्षणात्मक अंतरंग मनोगतातून व्यक्त केले.

कार्यक्रमाला राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रदिप खाडे, कादंबरीकार पुष्पराज गावंडे, ग्राहक मंच न्यायाधिश नितीन अग्रवाल, अॕड नितीन धुत, अंबादास तल्हार, संदिप देशमुख, विनय दांदळे, अॕड मनोज अग्रवाल, प्रा.मोहन काळे, अनिल मावळे, मनोज देशमुख, शामराव देशमुख, सुरेश तिडके, जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर, अनिल मावळे, गजानन घोंगे, गजानन थोरात, आशिष वानखडे, जिल्हा सचिव मनोहर मोहोड, बुढन गाडेकर, रमेश समुद्रे, अमित इंगळे, दिलीप नवले, सोनाली मोरे, वसंतराव देशमुख, प्रा.सुरेश कुलकर्णी, एकनाथ पाखरे, विजयराव बाहकर, कैलास टकोरे, डॉ.अशोक शिरसाट,अॕड संकेत देशमुख, देवीदास घोरळ, सुरेश पाचकवडे,नरेन्द्र देशमुख, डॉ.गौरव देशमुख, दिपक शिरसाट, फुलचंद वानखडे, रविंद्र देशमुख, शिवचरण डोंगरे, सुरेश भारती, सोनकुसरे, वसंत नकासकर, नारायण वाडेकर, चेतन थोरात, वासुदेव थोरात,अर्जून घुगे,प्रवीण वानखडे, गजानन चव्हाण, सतिश देशमुख, आकाश हरणे, पि.एल. जामोदे, शिवचरण डोंगरे, गजानन मुऱ्हे, संघपाल शिरसाट, कृष्णा चव्हाण, सिध्दार्थ तायडे, यशवंत शिंदे उपस्थित होते.

‌मेळाव्याचे संचालन प्रा.महादेव लूले तर आभारप्रदर्शन पुष्पराज गावंडे यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!