अकोला दिव्य न्यूज : Parliament Budget Session अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी गेल्या आठवड्यात राडा घातल्यानंतर सभागृह सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं. राहुल गांधी यांनी माजी लष्करी अधिकारी नरवणे यांच्या पुस्तकाचा उल्लेख केल्यानंतर गदारोळ झाला होता. जे पुस्तक प्रकाशित झालेलं नाही त्याचा उल्लेख राहुल गांधी कसा काय करु शकतात? असा प्रश्न सत्ताधारी बाकांवरील मंत्र्यांनी आणि खासदारांनी उपस्थित केला होता. दरम्यान मंगळवारी म्हणजेच आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात काँग्रेसने अविश्वास प्रस्ताव आणला आहे. या संदर्भातली सूचना लोकसभा सचिवांकडे देण्यात आली आहे.

११८ खासदारांनी केल्या सह्या
११८ खासदारांनी अध्यक्ष ओम बिर्लांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. या प्रस्तावावर ११८ खासदारांच्या सह्या आहेत. तृणमूल काँग्रेसने याबाबत तटस्थ भूमिका घेतली आहे.
विरोधकांनी काय मुद्दे उपस्थित केले आहेत?
१) विरोधी पक्ष नेते राहुल गांधींना बोलू दिलं जात नाही. २) विरोधी पक्षाच्या आठ खासदारांचं निलंबन करण्यात आलंय. ३) भाजपाच्या खासदारांनी माजी पंतप्रधानांबाबत केलेली वादग्रस्त वक्तव्यं, ती त्यांना का बोलू दिली? ४) काँग्रेस पक्षाच्या खासदारांवर हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप लोकसभा अध्यक्ष कसा काय करु शकतात?
हे चार मुद्दे मांडत अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
काँग्रेस, समाजवादी पक्ष, द्रमुख आणि इतर विरोधी पक्षांच्या ११८ खासदारांच्या स्वाक्षऱ्या असलेली ही सूचना लोकसभा सचिवालयात सादर करण्यात आली आहे. २ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपतींच्या अभिभाषण प्रस्तावादरम्यान राहुल गांधींना माजी लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांचं अप्रकाशित आत्मचरित्र, सभागृहाचा अवमान केल्याबद्दल आठ विरोधी खासदारांचं निलंबन करण्यात आलं, इतर मुद्द्यांवर चर्चा करण्याची संमती देण्यात आली नाही. यामुळे गोंधळ निर्माण झाला होता. विरोधी खासदारांना बोलू दिलं जात नाही असा आरोप विरोधकांनी केला
