Friday, January 16, 2026
No menu items!
No menu items!
Homeअकोल्यात प्रचंड निरूत्साह ! सरासरी 50 टक्के मतदान; यंदा 10 टक्क्यांनी कमी

अकोल्यात प्रचंड निरूत्साह ! सरासरी 50 टक्के मतदान; यंदा 10 टक्क्यांनी कमी

अकोला दिव्य न्यूज : तब्बल 9 वर्षानंतर होत असलेल्या अकोला महापालिका निवडणुकीत आज झालेल्या मतदानात मतदारांचा निरूत्साह उघडपणे दिसून आला. सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत उच्चभ्रू वसाहतींमधील मतदान केंद्रावर तुरळक प्रमाणात गर्दी होती. मतदान अत्यंत संथ गतीने सुरू होते. उच्चभ्रू वसाहतींमधील गरीब वस्तीत देखील निरुत्साह होता.पण अनेक कारणांमुळे या ठिकाणी 55 ते 60 टक्के मतदान झाले आहे. दुपारी 3.30 वाजेपर्यंत निवडणुकीतील 6 झोनमध्ये मतदानाची टक्केवारी 43.35 टक्के होती.

झोन 1 मध्ये दुपारी 3.30 वाजेपर्यंत 86 हजार 39 हजार 307 मतदारांनी मतदान केले. तर झोन 2 मध्ये 92,918 पैकी 36 हजार 548 तर झोन 3 मध्ये 1 लाख 20 हजार 566 पैकी 54 हजार 473 तसेच झोन 4 मध्ये 83 हजार 665 पैकी 36 हजार 560 तर झोन 5 मध्ये 84 हजार 659 पैकी 36 हजार 351 आणि झोन 6 मध्ये 81 हजार 968 पैकी 35 हजार 195 मतदारांनी मतदान केले याप्रमाणे दुपारी 3.30 वाजेपर्यंत एकुण 5 लाख 50 हजार 60 पैकी 2 लाख 38 हजार 434 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. यांची टक्केवारी 43.35 आहे.

सायंकाळी 5.30 वाजता मतदानाचा कालावधी संपला तेव्हा अनेक केंद्रांवर शुकशुकाट होता तर स्लम भागातील केंद्रांवर तुरळक गर्दी होती. शेवटच्या दोन तासात जास्तीत जास्त 4 ते 5 टक्के वाढ गृहीत धरले तर सरासरी 50 टक्के मतदान होण्याची शक्यता आहे. 9 वर्षांपूर्वी 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत 59.66 टक्के मतदान झाले होते. त्यावेळी भाजपाचे 48 उमेदवार विजयी झाले. यंदा घसरलेला टक्का कोणाच्या बाजूने कौल देणार हे उद्या मतमोजणीत दिसून येईलच.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!