Wednesday, May 13, 2026
No menu items!
No menu items!
Homeअकोला इन्कमटॅक्स चौकात भीषण अपघात ! एकजण गंभीर

अकोला इन्कमटॅक्स चौकात भीषण अपघात ! एकजण गंभीर

अकोला दिव्य न्यूज : अकोला शहरातील जुने इन्कम टॅक्स चौकात भरधाव वेगाने गोरक्षणकडे जाणाऱ्या अग्निशमन दलाच्या गाडीने मोटरसायकलला दिलेल्या जोरदार धडकेत मोटारसायकल चालक व त्यांच्यासोबत असलेला लहान मुलगा फेकल्या जाऊन रस्त्यावर आदळला. आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेत मोटारसायकल चालक गंभीररित्या जखमी झाला असून, सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलाला देखील मार लागला.

अकोला दिव्य छायाचित्र

धुळवड सण असल्याने या पांईटवर तैनात शिपाईने जखमींना तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठवून खदान पोलीस स्टेशनला माहिती दिली.

अकोला महापालिका अग्निशमन दलातील एम.एच 30 एच 5225 या क्रमांकाची गाडी गोरक्षण भागात लागेली आग विझविण्यास भरधाव वेगाने जात असताना, जुने इन्कम टॅक्स चौकात एम.एच. BG-7774 या क्रमांकाच्या मोटारसायकलला दिलेल्या जोरदार धडक दिली. या धडकेमुळे झालेल्या अपघातात अकोला-मलकापूर भागातील रहिवासी मोटारसायकल स्वार मनोज चंद्रकांत रोकडे (वय अं. ५०) गंभीररित्या जखमी झाले. त्यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर मोठा मार लागला असून नाक फ्रॅक्चर झाले आहे. त्यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अकोला दिव्य छायाचित्र

अग्निशमन दलाची गाडी आग विझवून परत येताना घटनास्थळी दाखल पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये उभी केली. विशेष म्हणजे ठिकाणी अपघात झाला त्याठिकाणी रस्त्यावर अतिक्रमण करून मंडप टाकून सामानाची विक्री केली जात आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ठिकाणी दररोज मोठ्या संख्येने दुकाने थाटली जातात. रोज वाहतुकीचा खोळंबा होतो. लहान सहान अपघात रोज होतात. सायंकाळी तर पायी चालत जाणेही जीवांवर बेतते.याकडे महापालिका अतिक्रमण विभाग, पोलीस विभागाचे लक्ष नाही.

Oplus_131072
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!