अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : अग्रवाल समाजाचे आराध्य दैवत महाराजा अग्रसेन यांचा मुख्य जयंती सोहळा रविवार ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता पोलीस लॉन येथे होणार असून या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पुणे येथील प्रसिद्ध उद्योजक व समाजसेवक पवन सराफ तसेच संभाजीनगर येथील उद्योजक व समाजसेवक डॉ. सुशील भारुका उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती अग्रवाल समितीचे अध्यक्ष महेन्द्र खेतान व पदाधिकाऱ्यांनी एका वार्ताहर बैठकीत दिली.

मुख्य जयंती सोहळ्यात रविवार ११ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० वाजता स्थानिक राणी सती धाम येथून महाराजा अग्रसेन यांची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. शोभायात्रेत विविध देखावे व आकर्षक झांक्या सहभागी होणार आहेत. त्यानंतर पोलीस लॉन येथे सायंकाळी ६.३० वाजता मुख्य जयंती सोहळा होणार आहे. यावेळी उद्योग, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे स्व.पोकरमल उमाशंकर खेतान यांना मरणोत्तर अग्रवाल समाजाचा प्रतिष्ठेचा “अग्र विभूती” पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.अशी माहिती अग्रवाल समितीकडून देण्यात आली.
महाराजा अग्रसेन जयंतीनिमित्त आयोजित विविध उपक्रमांना मंगळवार, ६ ऑक्टोबर पासून अग्रसेन भवन परिसरात सुरुवात होणार आहे. माजी ज्येष्ठ आ गोपीकिसन बाजोरिया, माजी आ बबनराव चौधरी, माजी आ विप्लव बाजोरिया, मनपा स्थायी समितीचे सभापती विजय अग्रवाल आणि नगरसेवक सागर भारुका यांच्या हस्ते श्री गणेशपूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. याच दिवशी दुपारी ३ वाजता मुंबईचे मंगलपाठ वाचक कुंदन मिश्रा हे राणी सती दादी यांचा मंगलपाठ करणार आहेत.

बुधवार, ७ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता भवनात महिला मंडळाच्या वतीने पाककला स्पर्धा, तर दुपारी ४ वाजता जुन्या दागिन्यांपासून रांगोळी तयार करण्याची स्पर्धा होणार आहे. रात्री ७ वाजता जवाहरनगर येथील महाराजा अग्रसेन भवनात नवयुवक मंडळाच्या वतीने भव्य “आनंद मेळावा” आयोजित करण्यात येईल.गुरुवार, ८ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता अग्रसेन भवनात अग्रवाल महिला मंडळाच्या वतीने “राजस्थानी मातीचे रंग, उत्सवाच्या संग” या विषयावर भव्य नाटिका सादर केली जाणार आहे.शुक्रवार, ९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता अग्रसेन भवनात भव्य आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिरात फिजिशियन डॉ. अशोक अग्रवाल, त्वचारोगतज्ज्ञ डॉ. आरती अग्रवाल, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. पूजा खेतान, वातरोगतज्ज्ञ डॉ. नीती केडिया, दंतरोगतज्ज्ञ डॉ. अंशुल गुप्ता, छाती व श्वसनरोगतज्ज्ञ डॉ. यश केडिया, डॉ. शुभम अग्रवाल, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. ईशांक गुप्ता आणि अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. अचिन मुरारका यांच्यासह अन्य वैद्यकीय तज्ज्ञ रुग्णांची तपासणी करणार आहेत.
दुपारी ३ वाजता महिला मंडळाच्या वतीने हिरव्या भाज्यांपासून दागिने तयार करण्याची स्पर्धा, त्यानंतर तुळशी कुंडी सजावट स्पर्धा आयोजित करण्यात येईल. दुपारी ४ वाजता कथाकथन स्पर्धा, तर सायंकाळी ५ वाजता जुन्या राख्या व कापडापासून तोरण तयार करण्याची स्पर्धा होणार आहे. सायंकाळी ५ वाजताच अग्रवाल समितीच्या वतीने “अग्रवाल आयडॉल” हा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून, त्यात कराओके ट्रॅकवर चित्रपटगीते सादर केली जातील.शनिवार, १० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता अग्रसेन भवनात अग्रवाल समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक सुशील खोवाल, रवि धानुका, डॉ. मनोज अग्रवाल आणि उद्योजक सोमेश बजाज उपस्थित राहणार आहेत.दुपारी ३ वाजता महिला मंडळाच्या वतीने मुलांसाठी “ज्युनियर मास्टर शेफ” पाककला स्पर्धा आयोजित करण्यात येईल. त्यानंतर मुलांसाठी श्लोक व नृत्य स्पर्धा होणार आहेत. यानंतर महिलांसाठी भजनांवर आधारित नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.मुख्य जयंती सोहळ्याच्या दिवशी, रविवार ११ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता अग्रवाल नवयुवक मंडळाच्या वतीने अग्रसेन भवनात मुलांसाठी संगीत खुर्ची आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.
महाराजा अग्रसेन जयंतीनिमित्त आयोजित या सर्व कार्यक्रमांमध्ये समाजातील महिला, पुरुष, युवक आणि युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. पत्रकार परिषदेस यावेळी अग्रवाल समितीचे अध्यक्ष महेंद्र खेतान, उपाध्यक्ष संतोष अग्रवाल, ओम साव, पुरुषोत्तम गुप्ता, सचिव विनोद अग्रवाल, अग्रसेन भवन ट्रस्टचे अध्यक्ष गिरीश अग्रवाल, ट्रस्टचे सचिव शैलेंद्र कागलीवाल, महिला मंडळाच्या अध्यक्षा मीना बाजोरिया, सचिव सीमा साव, नवयुवक मंडळाचे अध्यक्ष अँड केशव अग्रवाल, सचिव धवल अग्रवाल यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

समितीचे कोषाध्यक्ष मोहन अग्रवाल, सहकोषाध्यक्ष जगदीश झुनझुनवाला, सहसचिव प्रा. विजय अग्रवाल, पवन बाछूका, हिशोबनीस पवन अग्रवाल, भवन अधिकारी संजय टिकूपोते, महावीर गाडोदिया, कार्यकारिणी सदस्य दीपक गोयंका, आशीष चौधरी, प्रदीप गोयंका, पुरुषोत्तम अग्रवाल, संतोष अग्रवाल खडकी, गिरधर अग्रवाल, मनोज जाजोदिया, निहार अग्रवाल, अरुण अग्रवाल, अजय अग्रवाल, श्याम पोद्दार, गोविंद खेतान, गोपाल अग्रवाल, अनिरुद्ध चंगोईवाला, रोशन अग्रवाल, रोहित रुंगटा, अंकित अग्रवाल, दीपक अग्रवाल, अमित सराफ, अभिजित गोयंका, आनंद अग्रवाल, भवन व्यवस्थापक गणेश अग्रवाल तसेच महिला मंडळाच्या उपाध्यक्षा मनीषा पाडिया, ममता खेतान, नीता लोहिया, प्रमिला अग्रवाल, सोनल अग्रवाल, दर्शना गोयनका, शीतल गर्ग, अंजली साव, नीता बाजोरिया यांच्यासह अग्रवाल समिती, अग्रसेन भवन ट्रस्ट, महिला मंडळ व नवयुवक मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
