HomeLife­style Management ! पद्मालय वेलनेस येथे अकोला RPTS चा विशेष आरोग्य-जागृती उपक्रम

Life­style Management ! पद्मालय वेलनेस येथे अकोला RPTS चा विशेष आरोग्य-जागृती उपक्रम

अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : बदलती जीवनशैली, वाढता कामाचा ताण आणि सततच्या धावपळीत स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी दैनंदिन जीवनशैलीचे योग्य व्यवस्थापन आवश्यक असल्याचा संदेश राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त आयोजित विशेष आरोग्य-जागृती उपक्रमातून देण्यात आला. अकोला लगत भौरद गावाजवळील पद्मालय वेलनेस आयुर्वेद व निसर्गोपचार व अकोला येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘Life­style Management ‘जीवनशैली व्यवस्थापन’ या विषयावर विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पोलीस प्रशिक्षण केंद्रातील वरिष्ठ अधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी यांनी पद्मालय वेलनेस सेंटरला भेट देत केंद्राच्या संपूर्ण परिसराची पाहणी केली.

निसर्गरम्य वातावरण, विविध वनौषधी, हर्बल वृक्ष, जैविक उत्पादने तसेच आरोग्य व जीवनशैलीशी संबंधित विविध उपक्रमांची माहिती त्यांनी घेतली. यासोबतच आयुर्वेद, निसर्गोपचार, योग, आहार व्यवस्थापन आणि विविध पूरक नैसर्गिक उपचार पद्धतींच्या समन्वित कार्यपद्धतीची माहितीही उपस्थितांना देण्यात आली.
पद्मालय वेलनेस सेंटरमध्ये विविध आरोग्यविषयक पद्धतींचे एकत्रित नियोजन करण्यात आले असून, येथे ५० हून अधिक उपचार व आरोग्यविषयक पद्धतींचा समावेश असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. केरळमधील अनुभवी थेरपी स्टाफसह विविध तज्ज्ञ चिकित्सकांच्या माध्यमातून केंद्रातील उपक्रम राबविले जात असल्याचेही उपस्थितांना सांगण्यात आले. केंद्राची रचना, उपलब्ध विविध पद्धती आणि निसर्गाशी जोडलेली आरोग्यदृष्टी पाहून पोलीस प्रशिक्षण केंद्रातील उपस्थित अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

या भेटीदरम्यान उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पद्मालय वेलनेस परिसरातील वीरभद्रेश्वर मंदिरात दर्शन घेऊन शिवपिंडीचे पूजन केले. त्यानंतर राष्ट्रीय आयुर्वेद दिनाचे औचित्य साधून जीवनशैली व्यवस्थापनावरील मार्गदर्शनपर कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाला पोलीस प्रशिक्षण केंद्र, अकोला येथील प्राचार्य तथा पोलीस अधीक्षक डॉ. निलेश पांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक खंडारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ताकसांडे यांच्यासह पोलीस प्रशिक्षण केंद्रातील सुमारे ४० अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पद्मालय वेलनेसच्या कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा अग्रवाल, प्रशासकीय प्रमुख तथा निसर्गोपचार व वेलनेस कन्सल्टंट डॉ. आदित्य पुंड, तसेच केंद्रातील विविध तज्ज्ञ चिकित्सक, वैद्य, डॉ. अनिल ठोके, डॉ. वानखडे, विविध उपचार तज्ज्ञ आणि केरळमधील थेरपी स्टाफ उपस्थित होता.

कामाचा ताण व आरोग्य यातील संतुलनावर मार्गदर्शन , यावेळी डॉ. आदित्य पुंड यांनी ‘जीवनशैली व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन केले. पोलीस विभागातील जबाबदारीचे स्वरूप, अनियमित व तणावपूर्ण कार्यपद्धती, मानसिक व शारीरिक ताण आणि त्याचा दैनंदिन आरोग्यावर होणारा परिणाम यांचा संदर्भ घेत त्यांनी आरोग्यपूर्ण जीवनशैलीचे महत्त्व स्पष्ट केले.
नियमित आहार, योग्य दिनचर्या, शारीरिक हालचाल, योग व प्राणायाम, विश्रांती, झोप, ताण व्यवस्थापन आणि सकारात्मक जीवनशैली या घटकांचा आरोग्यपूर्ण जीवनासाठी कसा समन्वय साधता येतो, यावर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ‘आरोग्य ही केवळ आजार नसण्याची अवस्था नसून ती योग्य जीवनशैलीतून सातत्याने जपण्याची प्रक्रिया आहे,’ या दृष्टिकोनातून त्यांनी जीवनशैली व्यवस्थापनाचे विविध पैलू स्पष्ट केले.

मनोगत व्यक्त करताना पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य तथा पोलीस अधीक्षक डॉ. निलेश पांडे यांनी पद्मालय वेलनेसच्या उपक्रमांचे कौतुक केले. समाजात आयुष पद्धतींबाबत अधिकाधिक आरोग्य-जागृती निर्माण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
आरोग्य ही आज प्रत्येक नागरिकासमोरील महत्त्वाची बाब असून, वाढत्या ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर जीवनशैलीविषयक मार्गदर्शन आणि नैसर्गिक आरोग्यपद्धतींबाबत जनजागृती करणारे उपक्रम उपयुक्त ठरतात, असे डॉ. पांडे यांनी सांगितले. पद्मालय वेलनेसच्या कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा अग्रवाल यांच्या संकल्पनेतून विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविले जात असल्याचे नमूद करत त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.


संस्था, शासकीय कार्यालय, महाविद्यालयात आरोग्य-जागृती
दरम्यान, सामूहिक चर्चेदरम्यान पद्मालय वेलनेसच्या कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा अग्रवाल यांनी आरोग्य-जागृतीच्या व्यापक उपक्रमाबाबत भूमिका मांडली. विविध शासकीय कार्यालये, संस्था, प्रशिक्षण केंद्रे, महाविद्यालये आणि अन्य सामाजिक घटकांमध्ये त्यांच्या गरजेनुसार योग, जीवनशैली व्यवस्थापन, ताण व्यवस्थापन, आहार आणि प्रतिबंधात्मक आरोग्य यांसारख्या विषयांवर मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित करण्यासाठी पद्मालय वेलनेसच्या माध्यमातून सहकार्य करण्याची तयारी त्यांनी व्यक्त केली.समाजातील विविध घटकांनी आपल्या गरजेनुसार अशा आरोग्य-जागृती उपक्रमांची मागणी केल्यास त्यानुसार विषय निश्चित करून तज्ज्ञांच्या माध्यमातून मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करता येतील, असे डॉ. अग्रवाल यांनी सांगितले.पद्मालय वेलनेस आयुर्वेद व निसर्गोपचाराने उपचारात्मक उपक्रमांसोबतच आरोग्यशिक्षण, जीवनशैलीविषयक जागरूकता व प्रतिबंधात्मक आरोग्याच्या संकल्पना समाजापर्यंत पोहोचविण्यावरही भर दिला जात असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular