Homeअकोल्याच्या 'यज्ञ' हॉस्पिटलमध्ये तोडफोड ! महिला रूग्णाचा मृत्यूसाठी धरलं जबाबदार

अकोल्याच्या ‘यज्ञ’ हॉस्पिटलमध्ये तोडफोड ! महिला रूग्णाचा मृत्यूसाठी धरलं जबाबदार

अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : अकोला येथील राऊत वाडी रोडवरील एका प्रसुती व स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये एका महिला रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती आटोक्यात आणली. मृतक रूग्णाचा नातेवाईक आणि डॉक्टरकडून परस्परविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी तोडफोड करणाऱ्या मृताच्या काही नातेवाईकांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अकोला शहरातील बारा ज्योतिर्लिंग मंदिराजवळ असलेल्या यज्ञ हॉस्पिटलमध्ये रोशनी योगेश मोरे या महिला रुग्णावर उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले, जेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यज्ञ हॉस्पिटलमधील चुकीच्या (हलगर्जीपणाच्या) उपचारामुळेच रोशनी मोरे यांचा मृत्यू झाला, असा आरोप करत त्यांच्या संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात येऊन गोंधळ घातला आणि तोडफोड केली.

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार डॉक्टरांच्या बेजबाबदार आणि चुकीच्या उपचार पद्धतीमुळे रुग्णाचा नाहक जीव गेल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे.तोडफोड करणारे मृत महिला रुग्ण रोशनी मोरे यांचे संतप्त नातेवाईक आणि त्यांचे कुटुंबीय होते. (प्राथमिक वृत्तात तोडफोड करणाऱ्या सर्व व्यक्तींची नावे तात्काळ जाहीर करण्यात आलेली नाहीत).घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हॉस्पिटलमधील तोडफोड आणि गोंधळ घालणाऱ्यांवर कायदेशीर प्रक्रिया तसेच परिस्थिती नियंत्रणात आणण्याची कारवाई पोलिसांकडून करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular