Homeलॉयन्स इन्टरनॅशनल मीटमध्ये सुभाष चांडक बँकाक डिस्ट्रीक्ट स्पेशल अवार्डने सम्मानित

लॉयन्स इन्टरनॅशनल मीटमध्ये सुभाष चांडक बँकाक डिस्ट्रीक्ट स्पेशल अवार्डने सम्मानित

अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : बँकाक येथे डिस्ट्रीक्ट ३२३४ एच २ आणि बँकाक डिस्ट्रीक्ट ३१० डी यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या लॉयन्स इन्टरनॅशनल मीटमध्ये डिस्ट्रीक्ट ३२३४ एच २ चे डिस्ट्रीक्ट चेअरपर्सन इन्टरनॅशनल कन्व्हेनशन व मीटमध्ये लॉयन्स क्लब ऑफ अकोला मिडटाऊनचे ३९ सदस्य व बँकाकचा २४ सदस्यांनी सहभागी होऊन उच्चांक केला.यावेळी उपस्थितांनी आपल्याकडील प्रकल्पांची माहिती, विचारांची देवाण घेवाण, फ्रेंडशिप बॅनर तथा डीस्ट्रीक्टच्या पिनचे आदान प्रदान केले.

या कार्यक्रमात सुभाष चांडक यांना डिस्ट्रीक्ट गव्हर्नर सिधिसार्ट सिलापापोसाली यांनी अत्यंत प्रतिष्ठेच्या बँकाक डीस्ट्रीक्ट ३१० डी अवार्डने सन्मानित केले. सुभाष चांडक यांनी ३० वर्षात ५५ देशात अशा प्रकारचे आयोजन केले. यावेळी माजी प्रांतपाल रमाकांत खेतान, झोन चेअरपर्सन डॉ.मनोज अग्रवाल, डॉ.वर्षा अग्रवाल, रत्नमाला कापडे, अमित अग्रवाल, प्रशांत फुलारी, नेव्ही ऑफिसर चंद्रशेखर कोकाटे, प्रदीप मानकर, दयाराम रोहडा, डेनियल ट्रॅव्हल्स च्या सी.ई.ओ. भाविका सेठ, किशोर कापडे यांना सन्मानित केले.

तसेच सुधाकर बोचे, माजी डी.वाय एस.पी. विनोद ठाकरे, विजय गोडा, स्वाती शाह, बाळ सरकटे यांना पिन देऊन सम्मानित केले. डिस्ट्रीक्ट ३१० डी चे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर सिधिसार्ट सिलापापोसाली, डिस्ट्रीक्ट सेक्रेटरी जितबून जंताफान, डिस्ट्रीक्ट ट्रेझरर जरीयो बूनप्लो, जी.ई.टी ३१० डी एल.सुथेप मुआंगसिरी, रिजनचेअरपर्सन सुदापॉर्न थामविरीयानॉनट, डॉ. डेव्हिड थानाकीत, आय पी पी एम के कपूर, दिपेश जैन, ट्रेझरर ठाकूर २६-२७ झोनचे चेअरपर्सन दर्शन मेहता, रितू मेहता,अध्यक्ष २५-२६ विशाल माथुर, सचिव चलिता माथुर, अध्यक्ष २६-२७ विपुल शर्मा, शुबिका शर्मा यांना डिस्ट्रीक्ट गव्हर्नर अवार्ड पिन सर्टिफिकेट देऊन सम्मानित केले.

या अगोदर सुभाष चांडक यांना २०० च्यावर अवार्ड मिळाले आहे. त्यामध्ये महाराष्ट्र शासन द्वारा राज्यपाल यांच्या हस्ते, चिफ मिनिस्टर, स्टेट बँक ऑफ इंडिया, माहेश्वरी समाज ट्रस्ट अकोला, आर.सी. एफ. फर्टीलाझर कंपनी मुंबई, नारायण सेवा समिती उदयपुर, इंडियन असोसीएशन बँकाक, आंबेडकर ग्लोबल फाउंडेशन नवी दिल्ली, भारत भूषण, केंद्रीय मंत्री व भारतातील अनेक सामाजिक संस्था व विदेशातील संस्थाद्वारे सन्मानित केले आहे. .

यापूर्वी सुद्धा, अमेरिका, लंडन, कॅनडा, इस्त्राईल, फ्रांस, इजिप्त, ईटली, ऑस्ट्रेलिया, थायलॅन्ड, न्युझीलॅन्ड, मलेशीया, नेपाल, फुकेट, हॉगकॉंग, बॅलजीयम, चायना, हॉलॅन्ड, मालदिव, दुबई, श्रीलंका, स्वीत्झरलॅन्ड, ऑस्ट्रीया, वेनीस, मॉरीशीएस, भूतान अशा ५५ देशात मीट घेऊन डीस्ट्रीक्ट ३२३४ एच २ ची वेगळी ओळख निर्माण केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular