Homeअकोला MIDC मध्ये कारवाई ! तब्बल 7 हजार 26 किलो खाद्य तेल...

अकोला MIDC मध्ये कारवाई ! तब्बल 7 हजार 26 किलो खाद्य तेल जप्त ; लायसन्स निलंबित

अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : अकोला औद्योगिक वसाहतीतील दोन आस्थापनांची तपासणी करत भेसळीच्या संशयासह विविध गंभीर त्रुटी आढळून आल्याने तब्बल 7 हजार 26 किलो तेलसाठा जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आस्थापनांकडे केवळ Repacker Oil विक्रीचा परवाना असताना मात्र खुल्या स्वरूपात तेल विक्री केली जात असल्याचं तपासणीत आढळून आलं. गंभीर त्रुटींच्यापार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने दोन्ही आस्थापनांचे परवाने पुढील आदेशापर्यंत तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत.

संग्रहित छायाचित्र

प्रभुदयाळ लक्ष्मीनारायणवर कारवाई
अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने अकोला MIDC परिसरातील मे. प्रभुदयाळ लक्ष्मीनारायण या तपासणी केली. यावेळी Refined Soyabean Oil – Shakti चा अन्न नमुना तपासणीसाठी घेण्यात आला. उर्वरित तेलसाठा खुल्या स्वरूपात विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचं आढळलं. तसेच प्रयोगशाळा उपलब्ध नसणे, प्रयोगशाळेचे अहवाल नसणे, तेलाचा पुनर्वापर आणि भेसळीचा संशय यांसह अनेक त्रुटी आढळल्या. या कारवाईत 3,428 किलो 400 ग्रॅम तेलसाठा जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत 6 लाख 21 हजार 300 रुपये आहे.

भारतकुमार अँड ब्रदर्सकडून 3,598 किलो तेल जप्त
यानंतर मे. भारतकुमार अँड ब्रदर्स या कारखान्याचीही तपासणी करण्यात आली. येथे Refined Soyabean Oil – Loose चा नमुना घेण्यात आला. तपासणीदरम्यान खुल्या तेलाची विक्री, प्रयोगशाळा अद्ययावत नसणे, आवश्यक प्रयोगशाळा अहवाल उपलब्ध नसणे आणि भेसळीचा संशय यांसह विविध त्रुटी आढळून आल्या. या कारवाईत 3,598 किलो 400 ग्रॅम तेलसाठा जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत 5 लाख 61 हजार 350 रुपये आहे.

दोन्ही परवाने तात्काळ निलंबित
दोन्ही आस्थापनांकडे Repacker Oil साठी परवाना असतानाही नियमबाह्य पद्धतीने खुल्या तेलाची विक्री होत असल्याचं तपासणीत समोर आलं. खाद्यतेलाची गुणवत्ता आणि ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आढळलेल्या गंभीर त्रुटींची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने दोन्ही आस्थापनांचे परवाने पुढील आदेशापर्यंत निलंबित केले आहेत. या कारवाईमुळे खुल्या तेलाची विक्री आणि खाद्यतेलाच्या गुणवत्तेबाबत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular