Homeविधिज्ञ पवनेश अग्रवाल शिवसेना विधी सेलचे अकोला जिल्हाध्यक्ष

विधिज्ञ पवनेश अग्रवाल शिवसेना विधी सेलचे अकोला जिल्हाध्यक्ष

अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार अकोला जिल्हा न्यायालयातील युवा विधिज्ञ आणि मारवाडी समाजातील सक्रिय कार्यकर्ते अँड पवनेश रमेशचंद्र अग्रवाल यांना शिवसेना (शिंदे) कायदे विभागाला सक्षम करण्याची जबाबदारी सोपवत त्यांची अकोला जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली.त्यांच्या या नियुक्तीबाबत सर्वत्र अभिनंदन होत आहे.

मुंबई येथे एका सोहळ्यात शिवसेना कायदा विभागाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हेमंत केंजळकर व सचिव अनिल दळवी यांच्या हस्ते अँड पवनेश अग्रवाल यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी कोकण व मावळ विधानसभा संपर्क प्रमुख प्रशांत पालांडे, कायदे विभागाचे कार्याध्यक्ष संजय शुक्ला, ठाणे महापालिका माजी महापौर व शिवसेना सचिव संजय मोरे, किशोर निमकंडे आणि पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी अँड अग्रवाल यांचे अभिनंदन करून आगामी संघटनात्मक कामासाठी शुभेच्छा दिल्या.

पक्षाने विश्वास ठेवून दिलेली जबाबदारी जेष्ठांचे मार्गदर्शन आणि सर्वांच्या सहकार्याने सक्षमपणे पार पाडू असे अँड अग्रवाल यांनी सांगितले. अकोला लोकसभा संपर्क प्रमुख डॉ. राजन साळवी, संपर्क मंत्री ना. प्रताप सरनाईक, शिवसेनेचे विदर्भाचे नेते व माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू, शिवसेना उपनेते तथा माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यामुळे आपणास कार्य करण्याची संधी मिळाली आहे.असे सांगून अग्रवाल यांनी सगळ्यांचे आभार व्यक्त केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular