समाजवादी पक्षाचा प्रदेश सरचिटणीसपदी विजय पाटील ढोणे

0

अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी अकोल्यातील तरूण तडफदार व्यक्तिमत्वाचे विजय पाटील ढोणे यांची प्रदेश अध्यक्ष व माजी खासदार आणि आमदार अबु आझमी यांनी निवड केली. विजय ढोणे यांची पुरोगामी विचारधारा लक्षात घेवून पक्षाची महत्वपूर्ण जबाबदारी दिली. महाराष्ट्राच्या कार्यकारणीत ही पहिलीच निवड आहे. त्यांच्यातील सर्वधर्म समभाव या गूणामुळे हिंदू मुस्लीम ऐक्याची भावना अधिक घट्ट होईल असे प्रतिपादन अबु आझमी यांनी केले.महाराष्ट्रभर पक्षाचे काम करा मी पाठीशी उभा आहे, असा अबु आझमी यांनी विश्वास दिला.

महात्मा गांधीच्या जंयतीचे निमित्त साधुन विजय पाटील ढोणे यांनी नेत्रदानाचा तसेच अवयवदानाचा संकल्प केला. सामाजिक सेवेत अनेक लोकांच्या मदतीसाठी सदैव तयार राहतं गरिबांच्या हक्क व वंचित घटकांना न्याय मिळून देण्यासाठी या पदाचा वापर करणार असल्याचे मत ढोणे यांनी व्यक्त केले. त्यांच्या नियुक्तीमुळे पक्षातील तसेच पक्षाबाहेरील लोकांनी अभिनंदन करुन त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here