अकोला दिव्य न्यूज : शैक्षणिक क्षेत्रातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणात स्वतःचं तसेच कुटुबासोबतच समाज व शहराचे नावलौकिक करून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याची परंपरा १६ वर्षांपासून कायम ठेवून प्रशांत प्रतिभा पुरस्कार समितीने समाजात आदर्श पायंडा पाडला आहे. सिंधी समाजातील भावी पिढीने शिक्षणाची कास धरून शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली आहे, अशा शब्दांत मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करीत विद्यार्थी व कुटुंबाला भविष्यातील यशासाठी शुभेच्छा दिल्यात.

प्रशांत प्रतिभा पुरुस्कार अंतर्गत सिंधी समाजातील इयत्ता 10 वीं आणि 12 वीचे विद्यार्थी तसेच पदवीधर गुणवंत विद्यार्थ्यांचा दरवर्षी प्रमाणे यंदाही सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हॉटेल ग्रीनलँड कॉटेज येथे एका शानदार सोहळ्यात जवळपास 180 विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात हृदय स्पर्शी सत्कार करण्यात आला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व मार्गदर्शनासाठी खा.अनूप धोत्रे, आ.रणधीर सावरकर, खा.डॉ अनिल बोंडे, अमरावती मनपा महापौर श्रीचंद तेजवानी, अकोला मनपा महापौर शारदाताई खेडकर, भाजपा जिलाध्यक्ष गवांडे, भाजप महानगर अध्यक्ष जयंत मसने, रणजीत खेडकर आणि नगर सेवक अँड.देवाशीष काकड प्रामुख्याने उपस्थित होते.

सत्कार सोहळ्यात अकोला पूज्य सिंधी पंचायत अध्यक्ष रमेशभाई जग्यासी, शहर पंचायत भेरूमल वाधवानी, बाबा हरदासराम नगर पंचायत मनोहर पंजवानी, झूलेलाल नगर पंचायत सुरेंद्र नागदेव, सुविचर सोनार पंचायत रमेशलाल आलिमचंदानी, सक्खर पंचायत हरीश पारवानी, ब्राह्मण सोनार पंचायत मणिभाई जसमतिया, बहावलपुरी पंचायत ओमप्रकाश लालवानी, नानक नगर पंचायत दीपक लिलवानी, कन्हैयालाल रंगवानी, राजकुमार मूलचंदानी, प्रकाश आनंदानी, नंद आलिमचंदानी संतोष वाधवानी, सुरेश संतानी, कोडूमल चावला, विनय लालवानी, महेश संतानी, विजय आहूजा हीरालाल कृपलानी, हरीश कटारिया, मोतीराम आलिमचंदानी, हीरा आलिमचंदानी, हरीश मनवानी, सोनू जसूजा, गणेश राजपाल, जय गजवानी, नरेश पंजवानी, सन्नी जसमतिया, आशीष रोहडा, रवि आलिमचंदानी व समाजातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

सिंधी समाजातील गुणवत्ता श्रेणीतील आयुषी महेश छाबडिया (98.90) तसेच जानवी सुरेश बालानी, ऋतुज सतीश जेठवानी, गीत दीपक अरोरा, दिव्या वीरभान वाधवानी, दिशा मनीष विरवानी, हिमांशु मयूर खानचंदानी, प्रांशु दीपक पाहुजा, जिया वासुदेव राजपाल, खुशी अमित लोकवानी, रितिका सुशील आलिमचंदानी, मंथन माधवदास ग्वालनी, जिया सुरेश चंदानी, सागर रमेश हरवानी, पियांशी विजय आहूजा, जयंत मुकेश बालानी, नित्या आलिमचंदानी व गुणवंत विद्यार्थी, विविध उच्च पदवीधर उपस्थित होते.

प्रशांत प्रतिभा पुरस्कार समितीचे संयोजक आणि प्रमुख हरिशभाई आलिमचंदानी, प्रेरणा स्त्रोत श्रीमती कांता हरिशभाई आलिमचंदानी यांच्या मार्गदर्शनाखाली मागील १६ वर्षांपासून समितीचे सदस्य डॉ सुरेश केसवानी, डॉ प्रिया केसवानी, गौतम वाधवानी, ब्रह्मानंद वलेचा, श्रीमती मीरा आहूजा, अँड.राजेश चावला, संजय मोतियानी, प्रा सागर केसवानी, प्रा अंकुश आहूजा प्रा शेखर भारती, डॉ भावना भारती, प्रा नरेश शोधनानी, गीता पंजवानी, पूजा अडवानी, पायल केसवानी, कन्हैया आहूजा, शुभम जसवानी, गुड्डू धनवानी, राजेश सोनी, सिमरन सचदेव, प्रा दीपक शोधनानी, पूजा केसवानी, सुधीर बेलनी, भूमि सबलानी, नरेश बाशानी, रोशन नागवानी यांचे परिश्रम तसेच अरुण आलिमचंदानी, आर्कि.मधुर आलिमचंदानी, सागर आलिमचंदानी, इंजी.संदीप आलिमचंदानी यांच्या नियोजनातून कार्यक्रम यशस्वी करण्यात आला..
