Tuesday, June 9, 2026
No menu items!
No menu items!
Homeशिक्षणतज्ज्ञ प्रा.प्रकाश डवले शिवसेना विदर्भ प्रवक्तेपदी

शिक्षणतज्ज्ञ प्रा.प्रकाश डवले शिवसेना विदर्भ प्रवक्तेपदी

अकोला दिव्य न्यूज : शैक्षणिक क्षेत्रासोबत सामाजिक क्षेत्रात केलेल्या समाजविधायक कार्याची दखल घेत अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले प्रा. प्रकाश डवले यांची शिवसेनेचे विदर्भाचे प्रवक्तापदावर नियुक्ती करण्यात आली. शिवसेना अकोला जिल्हा पदाधिकारी व S.I.R मार्गदर्शन शिबिर अकोला जिल्हा संपर्क मंत्री तथा राज्याचे परिवहन मंत्री ना.प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनात नुकत्याच पार पडलेल्या शिबिरात अकोल्याचे ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते प्रा. प्रकाश डवले यांची शिवसेना पक्षाच्या ‘विदर्भ प्रवक्तेपदी’ नियुक्ती करण्यात आल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.

या निवडीने संपूर्ण विदर्भातील राजकीय व सामाजिक वर्तुळातून अभिनंदन होत असून सामाजिक व शैक्षणिक कार्याचा श यानिमित्ताने गौरव झाला आहे. प्रा.प्रकाश डवले यांची ही निवड त्यांच्या गेल्या अनेक वर्षांच्या निस्सीम समाजसेवेचे आणि संघटन कौशल्याचे द्योतक आहे. त्यांनी आजवर राबवलेले विविध उपक्रम पक्षासाठी आणि समाजासाठी दिशादर्शक ठरले आहेत. प्रामुख्याने धार्मिक व सांस्कृतिक कार्यात अकोला जिल्ह्यात येणाऱ्या ‘संत श्री गजानन महाराज पालखी सोहळ्याचे’ दरवर्षी त्यांच्या माध्यमातून अत्यंत भक्तीमय वातावरणात स्वागत केले जाते.

आरोग्य सेवेत सर्वसामान्यांसाठी मोफत रक्त आणि आरोग्य तपासणी शिबिरांचे सातत्याने आयोजन करून त्यांनी हजारो रुग्णांना वैद्यकीय मदत मिळवून दिली आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांसाठी ‘विद्यार्थी मार्गदर्शन शिबिरांचे’ आयोजन करून त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांना यशाचा मार्ग दाखवला आहे. शिवसेना उपक्रम व संवाद यात्रे दरम्यान शिवसेनेचे ध्येय-धोरण तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी संवाद यात्रा व विविध जनसंपर्क मोहिमा प्रभावीपणे राबवल्या आहेत.

या कार्यक्रमांमध्ये राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री ना. संजय राठोड, आमदार तथा माजी मंत्री बच्चूभाऊ कडू, अकोला लोकसभा संपर्कप्रमुख व माजी आमदार डॉ. राजन साळवी, उपनेते गोपीकिशन बाजोरिया, संपर्कप्रमुख संजना गवळी, जिल्हाप्रमुख नारायण गव्हाणकर,श्रीरंगदादा पिंजरकर, चंद्रशेखर पांडे गुरुजी , अश्विन नवले,उषा विरक,रेखा राऊत,महानगरप्रमुख राजेश मिश्रा, योगेश अग्रवाल,अनिल मालगे,डॉ.अभिजित प्रकाश डवले, आदित्य ठाकूर यांच्यासह शिवसेनेचे विदर्भातील सर्व प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडी आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

विदर्भात पक्षाची भूमिका भक्कमपणे मांडणारे प्रा. डवले आपल्या नियुक्तीनंतर म्हणाले, “पक्षप्रमुख आणि वरिष्ठ नेत्यांनी सामाजिक कार्याची दखल घेऊन जी जबाबदारी दिली आहे, तिला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करेन. विदर्भातील जनतेचे प्रश्न आणि पक्षाची भूमिका अत्यंत प्रभावीपणे आणि अभ्यासू वृत्तीने मांडणे हेच माझे मुख्य ध्येय असेल. प्रा.प्रकाश डवले यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून, त्यांच्या अभ्यासू व वक्तृत्व कौशल्याचा विदर्भात शिवसेनेला मोठा फायदा होईल, असा विश्वास राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!