Sunday, May 17, 2026
No menu items!
No menu items!
Homeअकोल्यात भररस्त्यात पतीने केला पत्नीचा खून ! पतीला अटक

अकोल्यात भररस्त्यात पतीने केला पत्नीचा खून ! पतीला अटक

अकोला दिव्य न्यूज : सतत सुरू असलेल्या घरगुती वादाची परिणती अखेर आज रविवारी सकाळी सकाळीच डाबकीरोडवर एका दुकानासमोर पतीने एकापाठोपाठ एक वार करून पत्नीचा खून करण्यात झाली. सकाळच्या वेळेत निर्घृण हत्या झाल्याची घटना घडल्याने नागरिक घटनास्थळी धावले. या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांमध्ये खळबळ उडाली. मृत महिलेचे नाव मंगला गुडदे (४०) असून त्या रेणुका नगर परिसरात भाड्याने राहत होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार गेल्या दोन वर्षांपासून दोघांमध्ये सतत घरगुती वाद सुरू असून आज सकाळी दीपक गुडदे आणि मंगला यांच्यात पुन्हा एकदा किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यानंतर मंगला गुडदे जवळच्या दुकानातून दुधाची पिशवी आणण्यासाठी गेल्या होत्या. मात्र वादानंतर संतापाच्या भरात दीपक याने दुकानात येऊन धारदार चाकूने पत्नीवर एकापाठोपाठ एक वार केले. पोटावर आणि पाठीत गंभीर वार झाल्याने मंगला गुडदे या जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. घटनेनंतर परिसरात धावाधाव झाली. मृत महिलेला एक मुलगा आणि एक मुलगी असून लवकरच मुलीचा विवाह करण्याचा कुटुंबाचा बेत होता. मात्र काळाने घाला घालत संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.


घटनेची माहिती मिळताच डाबकी रोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला आहे. आरोपी पती दीपक गुडदे याला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात हत्या घरगुती वादातून झाल्याचे समोर येत असून पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा कौटुंबिक हिंसाचाराचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!