अकोल्यात M.B कॉन्व्हेंटने ‘कात’ टाकली ! 100 टक्के यशाची परंपरा कायम

0

अकोला दिव्य न्यूज : पश्चिम विदर्भातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण क्षेत्राच्या शिरपेचातील मानाचा तुरा असलेल्या आणि मागील ८७ वर्षांपासून कार्यरत अकोला शहरातील नावलौकिक गुजराती हिंदी शिक्षण संस्थेतर्फे संचालित M.B कॉन्व्हेंटने नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या निकालात १०० टक्के यशाची परंपरा कायम ठेवून कॉन्व्हेट शिक्षण संस्कृतीत देखील आपले स्थान मजबूत केले आहे.

मुल्यवर्धित शिक्षणातून विद्यार्थ्यांचा भविष्याचा पाया मजबूत करणे, या उद्देशाने अलिकडच्या काळात एम.बी.कॉन्वेंट या नावाने सुरू केलेल्या शाळेत महाराष्ट्र शिक्षण मंडळ आणि CBSE board चा अभ्यासक्रम सुरू केला आहे. विशेष म्हणजे आज शिक्षणाचे व्यावसायीकरण झाले असताना येथे अत्यंत कमी शैक्षणिक शुल्क घेऊन मध्यमवर्गीय पालकांना मोठा आधार दिला जातो आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १० वीच्या परीक्षेत एम. बी.कान्वेंटचा विद्यार्थी तन्मय अनिल जोशीने 93.80 टक्के गुण मिळवून पहिला क्रमांक पटकावला आहे.यासोबतच गौरी प्रमाेद पारसकर हिने (88.20) द्वितीय आणि ओम दत्तात्रय चौधरीने 87.40 गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळवला आहे.राजेंद्र भगत (82.40), सिद्धी हरीश जोशी (82.20) भावेश सचिन शर्मा (76) आणि इतर विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. गुजराती हिंदी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष व चार्टर्ड अकाऊंटंड बी. एम.अग्रवाल, अध्यक्ष उमेश बगडिया, सचिव अनिल तापडिया व संचालक आणि मुख्याध्यापिका ममता चावला यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कधीकाळी अकोला शहरातील मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांना इयत्ता १ ते दहावी पर्यंत नाममात्र शुल्क घेऊन मुल्यवर्धित शिक्षण देण्यात अग्रेसर मुंगीलाल बाजोरिया विद्यालय नेहमीच विद्यार्थ्यांनी गजबजलेले राहतं होते. शहरातील नामवंत उद्योजक, व्यापारी, प्रतिष्ठित नागरिकांपासून गिरणी कामगारपर्यंत सर्वंच समाजातील विद्यार्थ्यांसाठी मुंगीलाला बाजोरिया विद्यालय हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जात होते. अनेक विद्यार्थ्यांनी येथील शिक्षणाच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेऊन स्वतःच्या कुटुंबासह या शाळेचे, अकोला शहराचे नावलौकिक केलेले आहे.

गुजराती हिंदी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष व चार्टर्ड अकाऊंटंड बी. एम.अग्रवाल, अध्यक्ष उमेश बगडिया, सचिव अनिल तापडिया व संचालक आणि मुख्याध्यापिका ममता चावला यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here