अकोला शहरात M-Square ची देवांशी गावंडे टॉपर ! इशिका बगडिया द्वितीय

0

अकोला दिव्य न्यूज : पश्चिम विदर्भातील विद्यार्थी व पालक यांच्या विश्वासाला सार्थ ठरवत CBSE इयत्ता १० वी परीक्षेच्या निकालात यशाचं शिखर पादाक्रांत करत, काल जाहीर करण्यात आलेल्या इयत्ता १२ वींच्या परिक्षेत विद्यार्थ्यांनी १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली असून M-Square Tutorials च्या देवांशी आनंद गावंडे या विद्यार्थिनीने ९८.३३ टक्के गुण मिळवून अकोला शहरातून पहिली तर इशिका अनुप बगडिया हिने ९७.१७ टक्के गुण मिळवून शहरातून दुसरी टॉपर राहण्याचा बहुमान मिळवला आहे.

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पाया तयार करणे, हेच सर्वस्व ठेवून M-Square Tutorials च्या संचालक मयंक थानवी यांनी सुरू केलेल्या शिकवणीतून शैक्षणिक अभ्यासक्रमासोबत विद्यार्थी मानसिकदृष्ट्या निरोगी आणि कणखर होत आहेत. हे इयत्ता १० वींच्या CBSE परिक्षेचा निकालानंतर काल जाहीर झालेल्या वाणिज्य विषयक इयत्ता १२ वीच्या निकालाने स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे ९५ टक्के आणि त्याहून अधिक गुण घेऊन ३ विद्यार्थी तर ९० टक्के आणि त्याहून अधिक गुण घेऊन १८ विद्यार्थी तर ८० टक्के आणि त्याहून अधिक गुण घेऊन ३१ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. अकाऊंटमध्ये १०० पैकी १०० गुण घेऊन २ विद्यार्थी तर अर्थशास्त्र विषयात १०० पैकी १०० गुण घेऊन १ विद्यार्थी आहे. नवीन बॅच लवकरच सुरू होणार असून प्रवेशासाठी एम स्क्वेअर ट्युटोरियल्स, देशोन्नती प्रेस जवळ, गोरक्षण रोड, अकोला येथे संपर्क साधावा.

वाणिज्य शाखा इयत्ता १२ वीमध्ये सारा श्रीगोपाल चौधरी (९६.५०) प्रीत कल्पेश विरमानी (९४.००) जिया सुरेश चंदनानी (९३.१७) वेदांत विष्णू मुंदडा (९२.८३) हेतल सचिन पारेख (९२.८३) नंदिश रवींद्र वाकोडे (९२.८३ ) जय रत्नपारखी (९२.६७) अथर्व सोहन नवकर (९२.६७) प्रिती रूपेश अग्रवाल (९१.८३) प्रज्वल संदेश घुगे (९१.८३) दिशा आनंद जैन (९१.५) भूमी श्याम राजदेव (९१.३३) गरिमा राजेश जालंधर (९१.१७) आणि आस्था योगेश कान्हेड (९०.८६) यांनी ९० टक्के पेक्षा जास्त गुण घेऊन लक्षवेधी यश संपादन केले आहे.

यासोबतच निहाल शर्मा (९०.५) अदिती मनीष जैन (८९.८३) प्रेम सचिन अग्रवाल (८९) माधव माहेश्वरी (८७.१७) मिहिका धुर्वदे (८७.१७) अदिती अभिजीत पिंपळे (८७.१७) दिव्या मंगेश कक्कड (८७) नमीत लधानी (८६.६७) दक्ष नितीन नेभानी (८५.६७) श्रावण राधेश्याम उंडळ (८४) कैवल्य प्रशांत गहाळे (८३.८३) गणेश शर्मा (८३.५) महक किशोर नवलरमानी (८३) गीत धनंजय देशमुख (८३) यांनी घवघवीत यश खेचून आणले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here