पटेल हत्याकांड ! अकोटचा कॉंग्रेस नेता राजू बोचे याला नागपूरात अटक

0

अकोला दिव्य न्यूज : अकोला जिल्ह्यातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे तत्कालीन उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्या हत्येतील फरार आरोपीला नागपुरातून नाट्यमयरित्या अटक करण्यात आली.नागपूर येथील रवी भवन परिसरातील हॉटेलमध्ये आरोपी जेवणासाठी आला असताना अकोटमधील काही लोकांनी त्याला ओळखले. पोलिसांना माहिती देऊन त्यांचा मागे धावत जाऊन पकडे. या दरम्यान बोचे व त्यांच्यांत झटापट झाली होती. सदर पोलीस ठाण्याच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले व अकोट ग्रामीणच्या पथकाच्या हवाली केले आहे.

अकोट तालुक्यातील मोहाळा गावात ६ जानेवारी २०२६ रोजी हिदायत पटेल यांच्यावर ते गावातील मशीदीतून नमाजनंतर बाहेर आल्यावर उबेद पटेल या तरुणाने त्यांच्यावर हल्ला करत वार केले होते. पटेल यांना इस्पितळात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी उबेदला अटक केली होती. या प्रकरणात काही राजकीय पदाधिकारी देखील आरोपी होते. अकोला जिल्ह्यातील कॉंग्रेस पदाधिकारी व जिल्हा परिषदेचा माजी कृषी सभापती राजू बोचे देखील आरोपी होता.

रवीभवन परिसरात बोचे जेवणासाठी गेला असता त्यावेळी अकोट तालुक्यातील काही राजकीय कार्यकर्ते त्याच परिसरात होते. त्यांनी राजूला ओळखले व त्याला पकडण्यासाठी धाव घेतली. त्यांच्यात झटापट झाली व राजूने देखील त्यांच्यावर हल्ला केला. लोकांनी त्याला चोप दिला व पोलिसांना फोन केला. सदर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने तेथे पोहोचले व राजूला ताब्यात घेतले. पोलिसांनी अकोट ग्रामीणच्या पथकाला या प्रकाराची माहिती दिली. अकोट ग्रामीण पोलीस पथक नागपुरात पोहोचले व नागपूर पोलिसांनी त्याला त्यांच्या हवाली केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here