अकोल्यात ‘उज्ज्वल’ भविष्याचा पाया म्हणजेच ‘एम-स्क्वेअर ट्यूटोरियल्स’

0

अकोला दिव्य न्यूज : भावी पिढीच्या उज्वल भविष्यासाठी, त्यांच्या विद्यार्थी दशेत त्यांचा शैक्षणिक पाया मजबूत करणं आवश्यक आहे. नेमकं शिक्षण आणि अचूक मार्गदर्शनाचा अभावाने विद्यार्थी आणि पालक भरडले जातात. भरकटत जातात. सध्याचा काळ खाजगी कोचिंगचा असून, याबाबत पालक व विद्यार्थ्यांना सखोल व अचूक माहिती नसल्याने त्यांची दिशाभूल होण्याचा धोकाही वाढतो. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन अकोला येथे जन्मलेले आणि वाढलेले मयंक थानवी हे एक दूरदृष्टी असलेले तरुण वयातच यशस्वी संस्थापक व संचालक म्हणून कार्यरत आहेत.

अकोला दिव्य ग्राफिक्स

खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये असलेल्या दर्जेदार शिक्षणातील महत्त्वाची उणीव भरून काढण्यासाठी, गणित आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे शिक्षक असलेले मयंक थानवी हे त्यांच्या एडटेक क्षेत्रातील ज्ञान व अनुभवाचा उपयोग करतात. प्रत्येक विद्यार्थ्यांला व्यक्तिगत पातळीवर मार्गदर्शन आणि कठोर परिश्रम घेत उत्कृष्ट कामगिरीने अल्पावधीतच मयंक थानवी यांनी अकोल्यातील शैक्षणिक क्षेत्रात ‘एम-स्क्वेअर ट्यूटोरियल्स’ या खाजगी कोचिंग क्लासेसचा दबदबा निर्माण केला आहे.

दर्जेदार शिक्षणातील महत्त्वाची उणीव भरून काढण्यासाठी ते गणित आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे शिक्षक म्हणून असलेल्या त्यांच्या एडटेक क्षेत्रातील ज्ञान आणि अनुभवाचा उपयोग करतात.

तरुण वयातील थानवी हे धोरणात्मक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा मजबूत पाया तयार करतात, जसे की: प्रथमच अकोल्यामध्ये शाळांनुसार तुकड्या सुरू करणे. वर्गाच्या निकालांचे जाहीर प्रदर्शन करणे. संपूर्ण प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता राखणे.हे सगळ काही एक सामाजिक बांधिलकी म्हणून काम करतात. त्यांची बांधिलकी आणि सखोल नेतृत्व पुढच्या पिढीला सक्षम करत आहे. यामध्ये तीळमात्र शंका नाही.

आता एम-स्क्वेअर ट्यूटोरियल्सने वाणिज्य (कॉमर्स) शाखेत भविष्य करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता ११ वी आणि इयत्ता १२ वी वाणिज्यातील इंग्रजी,गणित, लेखा (अकाउंट), एसपी, ओसीएम, अर्थशास्त्र आणि व्यवसाय अभ्यासक्रम इत्यादी विषयांची कोचिंग सुरू केली आहे. यासोबतच बोर्ड, क्लॅट आणि सीए फाउंडेशनसाठी स्वतंत्र बॅचेस देखील सुरू करण्यात आल्या आहेत. अत्यंत माफक पैशात हे सहज शक्य आहे. यासाठी ९३७०३ ३५४५५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा किंवा एम स्क्वेअर ट्युटोरियल्स, देशोन्नती प्रेस, गोरक्षण रोड, अकोला येथे प्रत्यक्ष भेट देऊन खात्री करून घ्यावी.असं आवाहन मयंक थानवी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here