Saturday, January 17, 2026
No menu items!
No menu items!
Homeकोणाचा महापौर ! अकोला मनपाच्या सत्तेचा 'क्लायमॅक्स' रंजक होईल

कोणाचा महापौर ! अकोला मनपाच्या सत्तेचा ‘क्लायमॅक्स’ रंजक होईल

अकोला दिव्य न्यूज : Who Mayor In Akola Marathi : अकोला महानगरपालिका निवडणुकीतील मतदानाची मोजणी होऊन निकाल जाहीर होऊन जवळपास 30 तासाचा कालावधी लोटला आहे. परंतु मतदारांनी भाजपला 38 जागा देऊन सत्तेची चावी इतरांच्या हाती दिल्याने मोठा पेच फसला आहे. कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने अकोला महापालिकेत कोणाचा महापौर? असा प्रश्न उपस्थित झाला असून या प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी मनपा सत्तेचा क्लॉयमॅक्स बघणं खरंच रंजक होईल.

अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तेचा पेच निर्माण झाला आहे. एकुण 80 सदस्यांच्या सभागृहात बहुमतासाठी 41 मताचा आकडा गाठणे आवश्यक असताना, 38 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दुसरीकडे, 21 जागांसह काँग्रेसने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली असून दोन्ही आघाड्यांनी सत्ता स्थापनेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

भाजपचे मित्रपक्ष आणि 1 अपक्षाच्या जोरावर सत्तेचे समीकरण : भाजपला बहुमतासाठी केवळ 3 जागांची गरज आहे.भाजपकडे स्वतःचे 38 नगरसेवक आहेत. महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या शिंदे यांची शिवसेना (01) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी (01) यांना सोबत घेतल्यास हा आकडा 40 पर्यंत पोहोचतो.दरम्यान अपक्ष उमेदवार आशिष पवित्रकार हे भाजपमध्ये परतण्याची शक्यता आहे का ? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर अकोला विकास समितीच्या एका विजयी उमेदवार भाजपच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. मात्र 42 या काठावरच्या बहुमतावर सत्ता स्थापन करण्याच्या भाजप नेत्यांची मानसिक तयारी असेलच असं सध्यातरी

काँग्रेसला महाविकास आघाडी आणि इतरांची अनपेक्षित साथ : दुसरीकडे, काँग्रेसनेही हार मानलेली नाही. महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि इतर लहान पक्षांना एकत्र करून सत्ता खेचून आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसचे 21, ठाकरे गटाचे 6, शरद पवार गटाचे 3, वंचितचे 5 आणि एमआयएमचे 3 नगरसेवक एकत्र आल्यास हा आकडा 38 होतो. अजित पवार गटाचा 1 आणि अकोला विकास समितीचा 1 नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न असले.
भाजपचे बंडखोर आशिष पवित्रकार यांना महत्त्वाच्या पदाची (जसं महापौर किंवा स्थायी समिती अध्यक्ष) ऑफर देऊन आपल्याकडे वळवणे. या सर्व समीकरणातून काँग्रेस 41 चा जादूई आकडा गाठण्यासाठी प्रयत्नशील आहे.
एकूण पक्षीय बलाबल :

एकूण जागा : 80 – बहुमताचा आकडा : 41

भाजप : 38
काँग्रेस : 21
उबाठा : 06
शिंदे सेना : 01
अजित राष्ट्रवादी : 01
शरद राष्ट्रवादी : 03
वंचित : 05
एमआयएम : 03
अपक्ष : 02
अकोला महापालिका विजयी उमेदवार :

प्रभाग क्रमांक 1 :

1) अ : शेख अब्दुल्ला : काँग्रेस : विजयी
2) ब : अजरा नसरीन मकसूद खान : काँग्रेस : विजयी
3) क : निलोफर खान : काँग्रेस : विजयी
4) ड : अब्दूल सलाम खान : काँग्रेस : विजयी

प्रभाग क्रमांक 2 :

5) अ : सीमा अंजुम : एमआयएम : विजयी
6) ब : शरद तुरकर : भाजप : विजयी
7) क : मैमूना बी : एमआयएम : विजयी
8) ड : सय्यद रहीम सय्यद हाशम : एमआयएम : विजयी

प्रभाग क्रमांक 3 :

9) अ :शशिकला काळे : भाजप : विजयी
10) ब : नितू महादेव जगताप : भाजप : विजयी
11) क : प्रशांत गोविंदराव जोशी : भाजप : विजयी
12) ड : निलेश रामकृष्ण देव : वंचित : विजयी

प्रभाग क्रमांक 4 :

13) अ : संदीप शेगोकार : भाजप : विजयी
14) ब : शिल्पा वरोकार : भाजप : विजयी
15) क : पल्लवी मोरे : भाजप : विजयी
16) ड : अभय खुमकर : शिवसेना उबाठा : विजयी

प्रभाग क्रमांक 5 :

17) अ : विद्या खंडारे : भाजप : विजयी
18) ब : जयंत मसने : भाजप : विजयी
19) क : रश्मी अवचार : भाजप : विजयी
20) ड : विजय अग्रवाल : भाजप : विजयी

प्रभाग क्रमांक 6 :

21) अ : आरती घोगलिया : भाजप : विजयी
22) ब : हर्षद भांबेरे : भाजप : विजयी
23) क : निकिता देशमुख : भाजप : विजयी
24) ड : पवन महल्ले : भाजप : विजयी

प्रभाग क्रमांक 7 :

25) अ : सुवर्णरेखा जाधव : काँग्रेस : विजयी.
26) ब : चांद चौधरी : अपक्ष : विजयी.
27) क : किरण मेश्राम : जमीला बी : काँग्रेस : विजयी.
28) ड : शेख फरीद शेख करीम : काँग्रेस : विजयी

प्रभाग क्रमांक 8 :

29) अ : सोनाली सरोदे : उबाठा : विजयी
30) ब : मनोज पाटील : उबाठा : विजयी
31) क : माधुरी क्षिरसागर : भाजप : विजयी
32) ड : राजेश्वर धोटे : भाजप : विजयी

प्रभाग क्रमांक 9 :

33) अ : प्रिया सिरसाट : काँग्रेस : विजयी
34) ब : निखत अफसर कुरेशी : काँग्रेस : विजयी
35) क : कनिजा खातून : काँग्रेस : विजयी
36) ड : मोहम्मद फजलू पहेलवान : काँग्रेस : विजयी

प्रभाग क्रमांक 10 :

37) अ : मंजुषा शेळके : भाजप : विजयी
38) ब : वैशाली शेळके : भाजप : विजयी
39) क : अनिल गरड : भाजप : विजयी
40) ड : नितीन ताकवाले : भाजप : विजयी

प्रभाग क्रमांक 11 :

41) अ : जैनब बी : काँग्रेस : विजयी.
42) ब : शाहीन अंजुम : काँग्रेस : विजयी.
43) क : फिरदोस परवीन : काँग्रेस : विजयी.
44) ड : डॉ. झिशान हुसेन : काँग्रेस : विजयी.

प्रभाग क्रमांक 12 :

45) अ :संतोष डोंगरे : भाजप : विजयी
46) ब : कल्पना गोटफोडे : भाजप : विजयी
47) क : उषा विरक : शिंदे सेना : विजयी
48) ड : सागर भारूका : उबाठा : विजयी

प्रभाग क्रमांक 13 :

49) अ : विशाल इंगळे : भाजप : विजयी
50) ब : प्राची काकड : भाजप : विजयी
51) क : सुनिता अग्रवाल : भाजप : विजयी
52) ड : आशिष पवित्रकार : अपक्ष : विजयी

प्रभाग क्रमांक 14 :

53) अ : उज्वला पातोडे : वंचित : विजयी
54) ब : जयश्री बहादूरकर : वंचित : विजयी
55) क : पराग गवई : वंचित : विजयी
56) ड : शेख शमसु शेख साबिर : वंचित : विजयी

प्रभाग क्रमांक 15 :

57) अ : हरीश अलिमचंदानी : भाजप : विजयी.
58) ब : मनिषा भंसाली : भाजप : विजयी
59) क : शारदा खेडकर : भाजप : विजयी
60) ड : बाळ टाले : भाजप : विजयी

प्रभाग क्रमांक 16 :

61) अ : सिद्घार्थ उपर्वट : भाजप : विजयी
62) ब : अमरीन सदफ : राष्ट्रवादी शरद पवार : विजयी
63) क : नर्गिस परवीन खान : राष्ट्रवादी अजित पवार : विजयी
64) ड : रफिक सिद्दीकी : राष्ट्रवादी शरद पवार : विजयी

प्रभाग क्रमांक 17 :

65) अ : जया गेडाम : काँग्रेस : विजयी
66) ब : अमोल मोहोकार : भाजप : विजयी
67) क : रफिया बी : काँग्रेस : विजयी
68) ड : आझाद खान : काँग्रेस : विजयी

प्रभाग क्रमांक 18 :

69) अ : स्मिता कांबळे : काँग्रेस : विजयी
70) ब : अमोल गोगे : भाजप : विजयी
71) क :आर्शिया परवीन : काँग्रेस : विजयी
72) ड : फिरोज खान : काँग्रेस : विजयी

प्रभाग क्रमांक 19 :

73) अ : धनंजय धबाले : भाजप : विजयी
74) ब : गजानन सोनोने : भाजप : विजयी
75) क :योगिता पावसाळे : भाजप : विजयी
76) ड : पुजा गावंडे : राष्ट्रवादी शरद पवार : विजयी

प्रभाग क्रमांक 20 :

77) अ : विजय इंगळे : उबाठा : विजयी
78) ब : सुरेखा काळे : उबाठा : विजयी
79) क : सोनाली अंधारे : भाजप : विजयी
80) ड : विनोद मापारी : भाजप : विजयी

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!