अकोला दिव्य न्यूज : ज्याला इथली माती माहिती, त्यालाच इथली प्रगती माहिती म्हणून प्रभागाचा स्थानिक रहिवासी निवडा आणि प्रगती घडवा, असं पहिल्या दिवसापासून घोषवाक्य व विकासाचा अजेंडा घेऊन महापालिका निवडणूक रिंगणात उतरलेल्या कॉंग्रेस पक्षाचा उमेदवार सरोज उदयसिंह चौहान यांनी पुर्ण प्रभाग पिंजून काढला. अत्यंत सामान्य राहणीमान आणि सामाजिक कार्यात सदैव तत्पर चौहान यांनी प्रभाग क्रमांक 12 मध्ये कडवे आवाहन निर्माण केले आहे असं शेवटच्या टप्प्यात दिसून येते.

कॉंग्रेस पक्षाचा परंपरागत मतदारांची संख्या या प्रभागात मोठ्या संख्येने असून इतर समीकरण जुळवून चौहान यांनी मतदारांना त्यांची दखल घेण्यास भाग पाडले.
आजपर्यंत मुलभूत सुविधांपासून लोक वंचित आहेत. तेव्हा या सोयीसुविधासोबत वाढीव करवाढ रोखणार, पाणी, रस्ते, लाईट, रोजगार, शिक्षण, महिला सक्षमीकरण व सुरक्षा, स्वच्छ प्रभाग-निरोगी प्रभाग यासाठी तयार केलेला जाहीरनामा हाच वचननामा आहे. विकासासाठी परिवर्तन आवश्यक आहे. असं मतं या भागातील नागरिक देखील व्यक्त करु लागल्याने प्रभाग 12 (क) मध्ये सरोज चौहान यांच्यामुळे चुरशीची तिरंगी लढत होणार आहे. असं चित्र दिसत आहे.
