‘रॅम्पकॉन’चा थाटात समारोप ! श्री श्याम ग्रेनाईटसह अनेक स्टाल्सला पुरस्कार

    0
    268


    अकोला दिव्य न्यूज : नागरी विकासाचा पाया हा निर्माण व स्थापत्य असून गृह संकल्पनेच्या दृष्टिकोनातून अशा रचनात्मक उपक्रमांची सातत्याने समाजाला गरज असल्याचे लक्षात घेऊन एसीसीई अकोला शाखा आणि आयआयए अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या मैदानात आयोजित ३ दिवशीय रॅम्पकॉन प्रदर्शनीचा एका कार्यक्रमात काल रंगारंग समारोप करण्यात आला.

    समारोपीय सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चनसिंग, मनपा आयुक्त सुनील लहाने व आयोजन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. समारोपीय सोहळ्यात गत तीन दिवसापासून उत्कृष्ट सजावट व मांडणी करून विक्रीची उलाढाल करणाऱ्या स्टॉल्सना सन्मानित करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते अशा उल्लेखनीय सेवा देणाऱ्या स्टॉलधारकांना स्मृतीचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले. प्रदर्शनीचा प्रथम स्टॉल युसुफी हार्डवेअर तर द्वितीय स्टॉल मॅजिक किचन हार्डवेअर आणि तृतीय स्टॉल श्री श्याम ग्रॅनाईट ठरला.

    केटेगिरी अवॉर्ड मध्ये सनविड कन्ट्रक्शन प्रथम, द्वितीय डेट ब्लॉक्स प्रा ली, तृतीय अडाणी सिमेंट,चतुर्थ श्री डेकोर, पाचवा वास्तू केअर, सहावा केनवुड, ७ वा बंदुकवाला फायर फायटींग, ८ वा छाया हँडलूम, नववा साईनाथ प्लायवुड, दहावा विवा कम्पोसीट पॅनल,अकरावा मॅक ईलवेटर्स, बारावा आर्कि शिवांगी हेडा, तेरावा डीलक्स पेंट्स, चौदावा श्री श्याम ग्रॅनाईट १५वा वारी सोलर्स व सोळावा स्टॉल आयकॉन स्टील ठरला

    जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चनसिंग यांनी या अभिनव प्रदर्शनीचे कौतुक करीत आपल्या शुभेच्छा बहाल केल्यात.यावेळी मनपा आयुक्त यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.संचालन एसीसीई सचिव अनुराग अग्रवाल, प्रा इस्माईल नजमी यांनी तर आभार आयोजन सचिव अभिजित परांजपे यांनी मानलेत.

    तीन दिवसीय प्रदर्शनीच्या सफलतेसाठी आयोजन सचिव अभिजित परांजपे, एसीसीई अकोला चेयरमन श्यामसुंदर साधवानी, एसीसीई सचिव अनुराग अग्रवाल, एसीसीई कोषाध्यक्ष रिझवान कुरेशी, एसीसीई केंद्रीय समिती सदस्य पंकज कोठारी, इस्माईल नजमी, आयआयए केंद्रीय सदस्य सुमित अग्रवाल, आयआयए चेअरमन कमलेश कृपलानी, सचिव सर्वेश केला, कोषाध्यक्ष मनीष भुतडा, एसीसीएई व आयआयएचे अजय लोहिया, मनोज मोदी, संजय भगत,नरेश अग्रवाल,ईश्वर आनंदानी, जयप्रकाश राठी, अतुल बंग, शैलेश वखारिया, किरण देशपांडे, चन्द्रशेखर मुखेडकर, अमित राठी, मयूर सिंघानिया, राजेश लोहिया,कपिल ठक्कर,श्याम ठाकूर, निलेश मालपाणी, इंद्रनील देशमुख, अमित राठी, सागर हेडा,नरेंद्र पाटील, पंकज कासट,श्रीकांत धनोकार, विक्रम केजरीवाल,

    प्रतीक भारंबे, संजीव जैन, प्रकाश ठोकळ, सुनील गुल्हाने, शैलेश मोदी, सय्यद अलाउद्दीन, एम चांदुरकर, शैलेश अग्रवाल, विशाल तडस, बजरंग अंभोरे, नरेश चौधरी, मिलिंद जोत, आयुष गुप्ता, शुभाश्री धनोकार, पियुशा जैन, रोहन चोपडे, ऋषभ रघुवंशी,रोहन काटकोरिया निखिल गावंडे, नेहा भैया, गौरव साधवानी, कुशल जैन, सागर हेडा,पवन अलसेट, निखिल बजाज, शिवाजी भोरे,श्रेयस सावजी, गौरी शर्मा निराग हेडा प्रदीप अग्रवाल, संजय अग्रवाल, गिरीश गुप्ता,पंकज भटकर, शिरीष वरणकार, राजेश घटाळे, अमोल महाजन,राजेश राऊत, अमित फोकमारे, प्रतीक भारंबे, निखिल बजाज, अंकुश खंडेलवाल समवेत एसीसीई अकोला शाखा,आयआयए अकोला शाखेच्या समस्त पदाधिकारी व सदस्यांनी मेहनत घेतली. राष्ट्रगीत व भव्य आतिषबाजीने या सोहळ्याचा समारोप झाला.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    error: Content is protected !!