Thursday, December 26, 2024
HomeUncategorizedआलिमचंदानी यांनी केले लहुजी साळवे व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

आलिमचंदानी यांनी केले लहुजी साळवे व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

अकोला दिव्य ऑनलाईन : सामाजिक समरसता आणि एकोपा जोपासत समाजातील सर्व घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी लहुजी साळवे उस्ताद यांनी केलेलं कार्य अविस्मरणीय आहे. मातंग समाजाला शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी सतत झटणारे लहुजी साळवे उस्ताद यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन, अण्णाभाऊ साठे यांनी लेखनी हाती घेऊन मातंग समाजाला साक्षर करण्यासोबतच विविधांगी लेखन करुन समाजाला नवी दिशा दिली.या अतुलनीय कामगिरीसाठी सर्व समाज सदैव यांच्या ऋणानुबंधात आहे. अशा शब्दात हरिशभाई आलीमचंदानी यांनी या महापुरुषांना आदरांजली वाहिली.

मातंग समाजाचे आराध्य लहुजी साळवे उस्ताद यांच्या जयंतीनिमित्त मातंग समाजाला शुभेच्छा देताना ते बोलत होते. यासोबतच रेल्वे स्टेशन चौक येथे असलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अलीमचंदानी यांनी दर्शन घेतले. यावेळी मोठ्या संख्येने मातंग समाज बांधव उपस्थित होते.

विर लहुजी साळवे उस्ताद यांच्या जयंती दिनाच्या पूर्वसंध्येला मातंग समाज बांधवांच्या संघटनेने अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघांची निवडणुक लढवत असलेले वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार हरीश आलिमचंदानी यांनी जाहीर पाठिंबा देत त्यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला आहे. विर लहूजी साळवे जयंती निमित्ताने आलिमचंदानी यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!