जेष्ठ स्वयंसेवक रामचंद्र अलकरी यांचं देहावसान ! उद्या अंत्यसंस्कार

0

अकोला दिव्य ऑनलाईन : जुने शहर येथील प्रतिष्ठित आणि जुन्या काळातील स्वयंसेवक तसेच ल.रा.तो.वाणिज्य महाविद्यालयाचे सेवानिवृत्त लेखापाल रामचंद्र गंगाधरपंत अलकरी यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी वृद्धापकाळाने आज गुरुवार १४ नोव्हेंबरला निधन झाले. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी विविध शैक्षणिक संस्थांमध्ये लेखापाल म्हणून सेवा दिली. त्यांच्या कार्यातून त्यांनी आपली एक अद्वितीय छाप निर्माण केली. त्यांच्या जाण्याने समाजातील एक अनुभवसंपन्न व्यक्तिमत्त्व हरपले आहे. त्यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी आणि मोठा आप्तपरिवार आहे.

अत्यंत साधी राहणी आणि शिस्तबद्ध जीवन, या तत्वानुसार अखेरच्या श्वासापर्यंत कार्यरत असलेले रामचंद्र अलकरी यांच्या निधनामुळे संघ परिवारात कधीच भरुन निघणार नाही अशी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनावर अकोला नगर संघ संचालक गोपालबाबू खंडेलवाल यांनी तीव्र शोक संवेदना व्यक्त केल्यात. त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा उद्या शुक्रवार दिनांक १५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता, श्री विठ्ठल मंदिर समोरील त्यांच्या राहत्या निवासस्थानाहून गुलजार पुरा स्मशानभूमी येथे निघेल. या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here