भगवान गौतम बुद्धांचा आशीर्वाद घेत अग्रवाल यांनी भीमनगर येथे कार्यकर्ते व नागरिकांशी साधला संवाद

    0
    329

    अकोला दिव्य ऑनलाईन : पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार विजय कमलकिशोर अग्रवाल यांनी भगवान गौतम बुद्धाचा आशीर्वाद घेत भीमनगर येथे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांना पक्षाच्या कार्यप्रणालीबद्दल विश्वास दिला आणि त्यांच्या पाठिंब्याने स्थानिक विकास साधण्याचे आश्वासन दिले. यामुळे पक्षाची कार्यशक्ती आणखी मजबूत होईल, असा विश्वास विजय अग्रवाल यांनी व्यक्त केला.

    याप्रसंगी आ. राजकुमार मेव, अश्विन नवले, वैशालीताई शेळके,शशी चोपडे, सिद्धार्थ शर्मा, योगेश अग्रवाल, ॲड पप्पू मोरवाल, गुड्डू चोपडे, निलेश निनोरे, वामनराव चोपडे, शंकर जोशी, राजेश भाळणे, नितीन ताकवले, प्रशांत चोपडे, मधुकरराव वानखडे, राजेंद्र तायडे, प्रसन्ना रत्नपारखी, पियुष जोशी आदी पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवारा कॉलनी येथील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांशी अकोला पश्चिमचे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार विजय अग्रवाल यांनी संवाद साधला. या संवाद दरम्यान, स्थानिक समस्या आणि आवश्यक सुधारणांवर चर्चा करण्यात आली. तसेच, भाजपाच्या धोरणांबद्दल माहिती देत 20 तारखेला भाजपाला मतदान करुन विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.नागरिकांना पक्षाच्या कार्यप्रणालीबद्दल विश्वास दिला आणि त्यांच्या पाठिंब्याने स्थानिक विकास साधण्याचे आश्वासन दिले. यामुळे पक्षाची कार्यशक्ती आणखी मजबूत होईल, असे विजय अग्रवाल यांनी सांगितले.

    याप्रसंगी महानगराध्यक्ष जयंत मसने, गणेश अंधारे ,सतीश गुप्ता, सुमन गावंडे, विजय इंगळे, रामदास खंडारे, विनोद मापारी, शारदा ढोरे, सुरेश गुप्ता, पुंडलिक नीमकांडे , रोहिदास कावळे, प्रवीण कावळे, बंटी खोटरे, ईश्वर तिवारी, तेजस खेडकर, कीर्ती सातपुते, अशोक भांडेकर, शामसुंदर काळे ,राजू इंगळे, पप्पू घोगरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    error: Content is protected !!