मापारी मित्र परिवाराचा उपक्रम ! आनंद मेळाव्यासह छत्रपती गणेश विसर्जन घाट सज्ज

0
मापारी मित्र परिवाराचा उपक्रम ! आनंद मेळाव्यासह छत्रपती गणेश विसर्जन घाट सज्ज

अकोला दिव्य ऑनलाईन : दहा दिवस मोठ्या भक्ती भावाने घरोघरी स्थापित आपल्या गणपती बाप्पांना मनोभावे निरोप देता यावा, या उद्देशाने कौलखेड येथील रिंग रोड वरील छत्रपती उद्यानामध्ये विनोद मापारी मित्र परिवारातर्फे छत्रपती गणेश विसर्जन घाट सुसज्ज केले आहे. मागील 9 वर्षांपासून या ठिकाणी शहरातील विविध भागातून हजारो भाविक गणेश विसर्जन सोहळ्यात सहभागी होत असतात. यावर्षी विशेष आकर्षण म्हणून आनंद मेळा असून यामध्ये आकाश पाळणा, मिकी माऊस, ट्रॅम्पोलिन, बोटिंग, बैलगाडी व घोडा सफारी, गन शूटिंगसह इतरही खूप सारे खेळ तसेच खाना-खजाना मध्ये 50 पेक्षा अधिक खाद्यपदार्थांचे स्टॉल राहणार आहेत, या व्यतिरिक्त सुद्धा आणखी भरपूर काही राहणार आहे.

दरवर्षीप्रमाणे मोठया उत्साहात प्रत्येक गणेश भक्तांचे सनई चौघडा व तुतारीच्या सुमधुर वादनाने स्वागत करीत गणेश घाटावर येणाऱ्या प्रत्येक भाविकभक्तांसह श्री गणरायाचे माताभगिनीव्दारे औक्षण व पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. या सोहळ्यात सहकुटुंब सहभागी होण्याचे आवाहन विनोद मापारी मित्र परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here