Wednesday, January 15, 2025
Homeगुन्हेगारीअकोल्यात ईगलचे मिश्रांवर जीवघेणा हल्ला : नागपुरला हलविले, प्रकृती धोक्याबाहेर

अकोल्यात ईगलचे मिश्रांवर जीवघेणा हल्ला : नागपुरला हलविले, प्रकृती धोक्याबाहेर

अकोला दिव्य ऑनलाईन : महाराष्ट्रातील महामार्ग निर्माण क्षेत्रातील ख्यातनाम ईगल इन्फ्रा लिमिटेड कंपनीचे विभागीय संचालक आणि भारतीय जनता पक्षाचा उत्तर भारतीय सेलचे प्रदेश अध्यक्ष राम प्रकाश मिश्रा यांच्यावर काल शुक्रवारी रात्री दोन अज्ञात व्यक्तींनी चाकूने पोट, छाती आणि हातावर सपासप वार करुन प्राणघातक हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे.या घटनेमुळे परिसरात व शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मिश्रा यांना तातडीने अकोला येथील आयकॉन हॉस्पिटलमध्ये भरती करुन त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे, मात्र पोटातील काही शिरा जखमी झाल्याने, त्यावर पुढील उपचार व शस्त्रक्रियेसाठी नागपूर येथील संचेती हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. दस्तुरखुद्द भाजप नेत्यावर जीवघेणा हल्ला झाल्याने पोलिस प्रशासनाचा किती जरब आहे. हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

अकोला शहर व जिल्ह्यात मागील १० वर्षांपासून ईगल इन्फ्रा कंपनीचे कामकाज सांभाळणारे राम प्रकाश मिश्रा मागील चार दिवसांपासून दिल्ली येथे होते. विशेष म्हणजे ही बाब त्यांच्या अत्यंत जवळचा लोकांनाही माहिती नव्हती. अशाच काल शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास आपल्या गाडीने तुकाराम हॉस्पिटल जवळ असलेल्या घरा जवळ पोहचले. गाडीतून खाली उतरत घराकडे जात असताना, तोंडावर मॉस्क असलेल्या दोन व्यक्ती मोटारसायकलवर आल्या आणि काही कळायच्या आत एकाने चाकूने पोटावर वार केले. मिश्रांनी प्रतिकार करीत आरडाओरडा केला.तेव्हा गाडीचा ड्रायव्हर मधात आला.परंतु तोपर्यंत मिश्रांच्या पोटासह छाती व हातावर सपासप वार करुन पळ काढला.या घटनेमागील नेमकं कारण काय? याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!