Sunday, December 22, 2024
HomeUncategorizedमख्खनलाल मदनलाल यांच्या पुत्रवधु सुनीता टेकडीवाल यांच निधन : उद्या अंतिम संस्कार

मख्खनलाल मदनलाल यांच्या पुत्रवधु सुनीता टेकडीवाल यांच निधन : उद्या अंतिम संस्कार

अकोला दिव्य ऑनलाईन : शहरातील ख्यातनाम उद्योजक आणि अग्रवाल समाजातील प्रतिष्ठित नागरिक मख्खनलाल मदनलाल टेकडीवाल यांच्या पुत्रवधु सुनीता सुरेश टेकडीवाल यांचे आज सोमवार १ जुलै रोजी उपचार सुरू असताना मुंबई येथे निधन झाले. राजस्थान येथील रामदेव बाबा यांचे परम भक्त आणि ‘जम्मा जागरण’ चे आयोजक कमल टेकडीवाल यांच्या लहान भावाच्या त्या पत्नी होत्या. त्यांच्या मागे पती सुरेश उपाख्य कानू टेकडीवाल, मुलगा वरुण आणि मोठे आप्त परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक मृत्यूची बातमी कळताच अनेकांना धक्का बसला.

अलिकडच्या काही दिवसांपूर्वी त्यांना सर्दी तापाचे संक्रमण होऊन आजारी पडल्या. अकोला येथील उपचाराने कोणताही सुधार न होता प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने मुंबईला हलविण्यात आले. उपचाराला प्रतिसाद मिळत असताना, अचानक संक्रमण वाढत जाऊन उपचाराला प्रतिसाद मिळत नव्हता आणि आज सकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मुंबई येथून त्यांचा मृतदेह घेऊन टेकडीवाल कुटुंबीय अकोल्याकडे मार्गस्थ झाले असून मृतदेह आज सायंकाळपर्यंत अकोला येथे पोहोचेल.
उद्या मंगळवार दिनांक २ जुलै रोजी सकाळी ९ वाजता गोरक्षण रोडवरील किर्ती नगर येथील राहते निवासस्थान ‘ श्री रामसा’ सदन येथून अंतिम यात्रा निघून, मोहता मिल मोक्षधाम येथे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!