तीनशेपेक्षा जास्त वर्षांची परंपरा ! भेंडवळची घटमांडणी अक्षय तृतीयेला : भाकित ११ मे रोजी

    0
    1201

    अकोला दिव्य न्युज ब्युरो : संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आणि तीनशे वर्षांपेक्षा जास्त वर्षांची परंपरा असलेली भेंडवळची घटमांडणी यावर्षी १० मे रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर केली जाणार आहे. यावर्षी पावसाचे अंदाज काय राहतील याकडे संपूर्ण शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.पीक परिस्थिती, पाऊसपाणी त्याचबरोबर सामाजिक, आर्थिक आणि देशाच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज सांगणारी भेंडवळची घटमांडणीबद्दल विदर्भातील सर्वसामान्य लोकांना देखिल उत्सुकता आहे.पीक परिस्थितीचा अंदाज, अतिवृष्टी, दुष्काळ, देशाची आर्थिक परिस्थिती, राजकीय भाकीत, पृथ्वीतलावर येणारी संकटे, परकीय शत्रूपासून होणारे धोके अशा अनेक प्रश्नांचे अंदाज मांडणाऱ्या भेंडवळ मांडणीच्या भाकिताकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले असते. या घटमांडणीचे भाकीत ११ मे रोजी वर्तविले जाणार आहे.

    बुलडाणा जिल्ह्यामध्ये जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या भेंडवळ या गावी घटमांडणीची ही परंपरा तीनशे वर्षापासून सुरू आहे. भेंडवळची घटमांडणी १० मे रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी केली जाईल. मांडणीचे भाकीत ११ मे रोजी पहाटे चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज जाहीर करणार आहेत. घटमांडणी नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत केली जाणार आहे. शेतकरी मोठ्या उत्साहाने या घटमांडणीचे भाकीत ऐकण्यासाठी उपस्थित असतात. घटांमध्ये झालेल्या बदलानुसार भाकिते वर्तविण्यात येतात.

    अशी केली जाते घटमांडणी

    अक्षय्य तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी गावाबाहेर बस स्टॅन्ड शेजारच्या शेतामध्ये घटाची मांडणी करण्यात येते. घटामध्ये गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा, मसूर, करडी इत्यादी अठरा प्रकारची धान्य ठेवण्यात येतात. घटाच्या मध्यभागी मातीची ढेकळे त्यावर पाण्याने भरलेली घागर ठेवतात. पानसुपारी, पुरी, पापड, सांडोळी- कुरडई हे खाद्यपदार्थ ठेवले जातात. रात्रभर त्या ठिकाणी कोणीही थांबत नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे या घटांमध्ये झालेल्या बदलाचे निरीक्षण केले जाते. त्यानंतर भाकीत वर्तविण्यात येते.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    error: Content is protected !!