अकोला पश्चिम’ ! काँग्रेसकडून साजिद खान पठाण रिंगणात : भाजपचा उमेदवार कोण ?

    0
    1285

    अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीत काँग्रेस उमेदवार म्हणून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी साजिद खान पठाण यांची उमेदवारी जाहीर केली. भाजपचा गड असलेल्या या मतदारसंघात आता भाजप कोणाची उमेदवारी जाहीर करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.अकोल्यात लोकसभेसोबतच रिक्त असलेल्या अकोला पश्चिम विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा देखील बिगुल फुंगल्या गेला आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात तब्बल २९ वर्षे भाजपचा झेंडा फडकावणारे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा आमदार गोवर्धन शर्मा यांचे ३ नोव्हेंबर २०२३ रोजी निधन झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली. या जागेसाठी लोकसभेसोबतच दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने गुरुवारी रात्री उशिरा आपला उमेदवार जाहीर केला. २०१९ ची विधानसभा निवडणूक काँग्रेसकडून लढणारे साजिद खान पठाण यांच्यावर पक्षाने पुन्हा एकदा विश्वास दाखवून पोटनिवडणुकीत उमेदवारी जाहीर केली आहे.

    महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते साजिद खान पठाण यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांना कडवी झुंज दिली होती. या निवडणुकीत गोवर्धन शर्मा यांना ७३ हजार २६२, तर साजिद खान पठाण यांना ७० हजार ६६९ मते मिळाली होती. दोन हजार ५९३ मतांनी साजिद खान पठाण यांचा पराभव झाला होता. आता पठाण पोटनिवडणुकीच्या रिंगणात पुन्हा उतरणार आहेत.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    error: Content is protected !!