Monday, December 30, 2024
Homeसलामीइतना सन्नाटा क्यो है भाई ? रामजी के घर देर है अंधेर...

इतना सन्नाटा क्यो है भाई ? रामजी के घर देर है अंधेर नहीं !

अकोला दिव्य : वाराणसी येथील सामुहिक बलात्कार प्रकरणातील पिडीत महिला हिंदू असूनही, देशातील तमाम वृत्तपत्र आणि दूरचित्रवाणी वाहिन्या व सोशल नेटवर्किंग साइट, माध्यमांमध्ये या घटनेनंतर आजपावेतो शुकशुकाट आहे.‌ रामराज्याची संकल्पना सांगणारी भारतीय जनता पार्टीही ‘जायबद’ आणि भाजपाचे स्व:नामधन्य मुलुख मैदानी तोफ तसेच महिला व तरुणींवर अत्याचार झाला की, विरोधकांवर तुटून पडणा-या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची तर या प्रकरणी वाचाच गेली.

एवढं सगळं कमी की काय, अटक केलेल्या आरोपींची पोलिस कोठडी ऐवजी संबंधित पोलिस स्टेशनच्या तपास अधिकाऱ्यांनी चक्क न्यायालयीन कोठडी घेतली. तेव्हा प्रश्न असा की, इतना सन्नाटा क्यो है भाई ? तर उत्तर असे आहे की, या सामुहिक बलात्कार कांडातील आरोपी कुणाल पांडे, सक्षम पटेल व अभिषेक चौहान हे नराधम भाजपचे पदाधिकारी आहेत. इतकेच नव्हे तर पंतप्रधान मोदी, डॉ.जे.पी.नड्डा, स्मृती इराणी अशा मंडळींशी जिव्हाळा व जवळीक आहे असे स्पष्ट करणारी त्या बलात्काऱ्यांची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. या संघ स्वयंसेवकांनी हिंदू विद्यापीठात, काशी नगरीत, मोदींच्या प्रिय वाराणसी नगरीत एका अबलेच्या इज्जतीचे धिंडवडे काढले. मात्र असे प्रकरण एखाद्या गैरभाजपशासित राज्यात घडले असते तर,..तर भाजपच्या बजरंगी फौजांनी तेथे कूच केले असते व पाठोपाठ स्मृती इराणी व गृहमंत्री अमित शहादेखील तेथे पोहोचले असते….. की नाही ? जर पोहचले असते तर यावर ‘इतना सन्नाटा क्यो है भाई ?

हिंदुत्व व सनातन धर्माचा इतरांना डोज पाजणा-या पक्षाच्या समाज माध्यमांतील या विकृत मानसिकतेच्या नराधमांनी हे कुकर्म बनारस हिंदू विद्यापीठात दोन महिन्यांपूर्वी केल्याचं नुकतंच उघडकीस आलं. तीन आरोपींना नुकतीच अटक करण्यात आली. मात्र नराधमांना कठोर शिक्षा होण्याची ‘गॅरंटी’ नाही. कारण बलात्कार कांडातील तीनही आरोपी भाजपच्या ‘आयटी सेल’चे मुख्य पदाधिकारी असून त्यांचे संघ शाखेवर नियमित जाणे-येणे आहे. हे बलात्कारी ‘संघ’ परिवाराशी नात्यात असल्याने दोन महिने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला. पीडित मुलगी व तिच्या कुटुंबावर दबाव आणून, आमिषे दाखवून प्रकरण रफादफा करण्याची योजना तथाकथित हिंदू संस्कृती रक्षक व दक्षक अमलात आणू शकले नाही. इतके मोठे दुर्योधनी दुष्कर्म घडूनही भाजप आता जणू विपश्यनेला बसला आहे. भारतीय जनता पक्षाचे खरे चालचरित्र हेच आहे. नराधम हे हिरव्या लुंगीतले नसून डोक्यावर काळी टोपी व खांद्यावर भगवे उपरणे टाकून भाजपच्या अंधभक्तांचे नेतृत्व करणारे आहेत. बनारस हिंदू विद्यापीठास कलंकित करण्याचे काम भाजपच्या भक्त मंडळींनी केले. त्याचे प्रायश्चित्त कसे करणार ? हा सवाल असून, अंधेर नगरी, चौपट राजा, टक्का शेर भाजी, टक्का शेर खाजा, सारख्या काळात हे होणार. पण येणाऱ्या काळात निश्चितच उत्तर मिळेलच ! रामजी के घर देर है अंधेर नहीं.असं म्हणतात,ते खोटं नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!