Wednesday, January 15, 2025
Homeअपघातनागपुरातील एक्सप्लोझिव्ह कारखान्यात भीषण स्फोट; ९ जणांचा मृत्यू

नागपुरातील एक्सप्लोझिव्ह कारखान्यात भीषण स्फोट; ९ जणांचा मृत्यू

नागपुरातील एका मोठ्या एक्सप्लोझिव कारखान्यात स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या कारखान्यात मोठ्या प्रमाणावर दारूगोळा तसेच रसायने असल्यामुळे यात जीवितहानी झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. या स्फोटाची तीव्रता नेमकी किती होती याची अद्याप माहिती समोर येऊ शकलेली नाही. मात्र, एक इमारत उध्वस्त झाल्याचे समजते. स्फोटात एकुण ९ लोकांचा मृत्यू तर ३ जण बचावल्याची प्राथमिक माहिती आहे.पोलिसांचे पथक तेथे पोहोचले असून आतमध्ये पोहोचून स्थिती स्पष्ट होऊ शकेल अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदीप पखाले यांनी दिली.

सोलार कंपनीच्या स्फोटातील मृतकांची नांवे

1 युवराज किसनाजी चारोडे बाजारगांव

2 ओमेश्वर किसनलल मछिर्के चाकडोह,

3 मिता प्रमोद उईके, अंबाडा सोनक काटोल,

4 आरती निळकंठा सहारे कामठी ,

5 श्वेताली दामोदर मारबते, कन्नमवार ग्राम, वर्धा,

6 पुष्पा श्रीरामजी मानापुरे, शिराळा, अमरावती, 

7 भाग्यश्री सुधाकर लोणारे, भुज  ब्रम्हपुरी ,

8 रुमीता विलास उईके, ढगा वर्धा,

9 मोसम राजकुमार पटले, पांचगांव भंडारा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!