Saturday, December 21, 2024
Homeराजकारणकर्नाटकचं सरकार कधीही कोसळेल अशी स्थिती, काँग्रेसचे ५० ते ६० आमदार..! ...

कर्नाटकचं सरकार कधीही कोसळेल अशी स्थिती, काँग्रेसचे ५० ते ६० आमदार..! कुमारस्वामी यांचा मोठा दावा

जनता दल (सेक्युलर) चे नेते आणि माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी सत्ताधारी काँग्रेस पक्षातले ५० ते ६० आमदार फुटून भाजपात जाऊ शकतात आणि महाराष्ट्रात घडलं तसं सत्ता परिवर्तन कर्नाटकात घडू शकतं असा दावा केला आहे. काँग्रेस पक्षातले एक प्रभावशाली मंत्री आहेत ज्यांना केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईपासून वाचायचं आहे. त्यामुळे ते आणि त्यांच्यासह ५० ते ६० आमदार हे भाजपात जातील असा दावा केला आहे. सध्या त्या बड्या नेत्याची भाजपाशी चर्चा सुरु आहे असंही त्यांनी सांगितलं.

कर्नाटकचं सरकार कधीही कोसळू शकतंकर्नाटकच्या काँग्रेस सरकारमध्ये सारं काही आलबेल नाही. कर्नाटकचं सरकार कधीही कोसळू शकतं. काँग्रेसमध्ये मोठा प्रभाव असलेले एक मंत्री भाजपात जाऊ शकतात. केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी ते हे पाऊल उचलतील आणि त्यानंतर कर्नाटकचं सरकार कोसळेल असा मोठा दावा कुमारस्वामी यांनी केला आहे. त्या बड्या नेत्यावर असे आरोप आहेत की त्यातून वाचणं जवळपास कठीण आहे. त्यामुळे ते लवकरच भाजपाची वाट धरु शकतात. त्यांच्यासह ५० ते ६० आमदार जातील असंही कुमारस्वामी यांनी म्हटलं आहे.

सरकार कधीही कोसळेल अशी परिस्थितीएनडीटीव्हीशी बोलताना कुमारस्वामी यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांना जेव्हा हा बडा नेता कोण? नाव सांगा हे विचारलं असता ते म्हणाले छोट्या नेत्यांकडून फोडाफोडी होत नाही. ही गोष्ट फक्त ज्यांचा प्रभाव जास्त प्रमाणात आहे तेच करु शकतात. एक बडा नेता आहे ज्याची भाजपाशी बोलणी सुरु आहेत. त्या नेत्यासह ५० ते ६० आमदार भाजपात जातील. महाराष्ट्रात जसं एकनाथ शिंदे यांनी केलं आणि त्यानंतर तिथे जसं सत्तांतर झालं तशीच परिस्थिती कर्नाटकातही उद्भवू शकते. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कर्नाटकात कधीही काहीही घडू शकतं.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!