अकोला दिव्य न्युज ब्युरो : सर्वसामान्य जनतेला दैनंदिन व्यवहारात लागणारे १०० व ५०० रुपये मूल्यांचे स्टॅम्प पेपर्स बंद करण्यात येऊ नये. स्टॅम्प पेपर्सची विक्री मर्यादा वाढवुन वारसांना अनुकंपा प्रमाणे परवाना हस्तांतरीत करण्यात यावे.भविष्यात मुद्रांक विक्री धोरणात काही बदल करण्याचे झाल्यास शासनाच्या नविन प्रणालीत मुद्रांक विक्रेता व दस्तलेखनिक यांच्या मार्फतच ती राबविली जाईल, याची हमी देण्यात यावी, या प्रमुख मागण्या मंजुर होण्यासाठी शासनमान्य मुद्रांक विक्रेता व दस्तलेखनिक महासंघ अंतर्गत अकोल्यातील मुद्रांक विक्रेते व दस्तेलेखनिक यांच्याकडून आज ३० आक्टोबरला एकदिवसीय धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले आहे. राज्यस्तीय संघटनेने वेळोवेळी व्यवसाय संदर्भात मागण्या मंजूर होण्यासाठी अनेकदा शासनाशी पत्र व्यवहार केले. निवेदनही देऊन व प्रत्यक्ष भेटीही घेतल्यात परंतु आजपावेतो शासनांकडुन कुठल्याही स्वरुपाची दखल घेतलेली नाही.
मागील काळात सुध्दा ३० हजार रुपयांपर्यंतची मुद्रांक विक्री मर्यादा कमी करुन १० हजार रुपये केली.आता सुध्दा १०० व ५०० रुपये किंमतीचे मुद्रांक पेपर बंद करण्याचा विचार शासन करीत आहे.
वास्तविक मुद्रांक विक्रेते व दस्तलेखनिक हे ब्रिटीश काळापासुन सुमारे ५० ते ६० वर्षा पासुन राज्यातील जनता व शासनाच्या दुवा म्हणुन काम करीत आहेत. शसनाच्या प्रत्येक योजना जनतेपर्यंत पोहचवित आहोत. परंतु आता शासन नविन धोरण अवलंबित असुन खाजगीकरण करण्याचा एकतर्फी निर्णय घेण्याचा तयारीत शासन असुन बँक, पोस्ट कार्यालय, व खाजगी एजन्सी यांच्या मार्फत फ्रँकींग मशिन द्वारा स्टॅम्प पेपर वितरीत करण्याचा विचार आहे. वास्तविक फ्रँकींग मशीन यापुर्वी सुध्दा दुय्यम निबंधक कार्यालय व बँकांना दिले होते. त्याचे काय झाले. हे सर्वांना माहिती आहे.
त्यामुळेच शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व आमच्या प्रमुख मागण्या मान्य होण्यासाठी तसेच नविन शासन धोरणात समाविष्ठ करणे साठी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात शासनमान्य मुद्रांकविक्रेता व दस्तलेखक महासंघाचे अध्यक्ष प्रकाश शेळके, दिपक बोरकर, विजयकुमार चक्रे, दिलीप पांडे, सुनील खुमकर, जगदेव पारधी, एस डी मोरे, गोपाल चौधरी, देवानंद अंभोरे,सी एस उगले, भारत गवई, अनिल बाकडे, जयंद्रा खेडकर, किशोर लड्डा , एन एस शर्मा ,धीरज ठाकूर ,शशिकांत वाघ, अनिल सदाशिव ,देवेंद्र देशमुख, प्रभाकर राऊत, रत्नदीप खरात, सय्यद राशीद, सुधीर खडे आदीसह अनेकांची उपस्थिती होती.