आज ‘आरएसएस’ चा विजयादशमी महोत्सव : प्रमुख वक्ता विजय देवांगण

0
आज ‘आरएसएस’ चा विजयादशमी महोत्सव : प्रमुख वक्ता विजय देवांगण

अकोला दिव्य न्युज ब्युरो : हिंदू समाजातील पौरुष व पराक्रमाचा अलख हा विजयादशमीच्या पवित्र पर्वात करण्यात येते. दरवर्षीच्या परंपरानुसार यंदा ही शस्त्रपूजन आणि विजयादशमी उत्सवाचे आयोजन अकोला महानगर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून करण्यात आले आहे.

शहरातील गोरक्षण रोडवरील होमिओपॅथी कॉलेज मैदान (एकविरा मैदान), माधव नगर येथे आज रविवार दि.२९ अक्टोंबर २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता होऊ घातलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पोहरादेवी संस्थानाचे धर्मगुरू व महंत बाबुसिंग महाराज उपस्थित राहणार आहेत. प्रमुख वक्ता म्हणून कर्णावती केंद्रातील क्षेत्र सहसंपर्क प्रमुख विजय देवांगण आमंत्रित आहेत.

कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच सहपरिवार उपस्थित राहून, प्रमुख अतिथी आणि प्रमुख वक्ता यांच्या विचारांचा आणि मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन महानगर संघचालक गोपाल खंडेलवाल यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here