अकोला दिव्य न्यूज : मोहल्ला क्लिनिंग अभियानांतर्गत प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या रविवारी ॲड.धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प व निलेश देव मित्र मंडळातर्फे महापालिकेच्या सहकार्याने १९ जानेवारीला पहिल्या टप्प्यात जठार पेठ भागात हे अभियान राबविल्या नंतर आज दुसरा टप्पा दि.१६ फेब्रुवारी रोजी रविवारी सकाळी ७.३० वाजतापासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत हद्दवाढ भागातील खरप बु परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी १२५ स्वयंसेवकांनी सहभाग घेत रस्ते, नाल्या साफ केल्या.
स्वच्छ व सुंदर अकोला शहराचे स्वप्न साकार करणे हे केवळ महानगरपालिकेचीच जबाबदारी नाही. तर ती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. या दृष्टीकोनातून ॲड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प व नीलेश देव मित्र मंडळाने रविवारी शहरात ठिकठिकाणी महापालिकेच्या स्वच्छता विभाग व पुर्व झोन कार्यालयाच्या सहकार्याने मोहल्ला क्लिनिंग अभियान राबविले.

७ वर्षांनंतर खरपच्या स्मशानभूमीची करण्यात आली स्वच्छता जेसीबी खाली भुखंड स्वच्छ करण्यात आले. फवारणी यंत्राच्या माध्यमातून फवारणी करण्यात आली. त्यानंतर स्वयंसेवकांनी रस्ते, नाल्या साफ केल्या. अनेक ठिकाणी कचरा उचलून घंटागाडीमध्ये टाकण्यात आला. या उपक्रमात निलेश देव मित्र मंडळाचे प्रमुख निलेश देव, ज्येष्ठ नाट्यकर्मी दिलीप देशपांडे, जयंत सरदेशपांडे, मनपा पुर्व झोनचे सहाय्यक आयुक्त विजय पारतवार, मनपा आरोग्य विभाग प्रमुख संजय खोसे, प्रविण मनोहर तसेच रश्मी देव, वंचीतचे जेष्ठ नेते मनोहरराव बनसोड,सुगत तायडे,जगन्नाथ इंगळे, राजू नागे, शवानंद इंगळे, चंद्रशेखर इंगळे,राजू इंगळे, विलास बनसोड,पारणाथ इंगळे, योगेश कंकाळे, राम चाहाकर, वैभव इंगळे,निलेश बनसोड, धम्मा जामनिक, अवंतिका मैराळ, राजेंद्र गुणल्लवार, प्रकाश जोशी, राजु भाऊ कनोजिया,अजय शास्त्री, रामहरी डांगे, रविंद्र मेश्राम, राजु कनोजिया, विजय वाघ, शैलेश देव, गणेश मैराळ आशु यादव, निलेश दुधलम,बबलु तिवारी आदी उपस्थित होते.
स्वच्छ अकोला सुंदर अकोला शहराची संकल्पना पुर्णत्वास नेण्याच्या व वाढत्या मच्छरांवर मात करण्यासाठी खरप येथील प्रत्येक घरातील शौचालयाच्या पाईपाला मच्छर मुक्ती जाळी वाटप करुन याबाबत नीलेश देव मित्र मंडळाकडून जनजागृती करण्यात आली.